Back to feed
A
Aditya Deshmukh Good_Morning · Mixed · Good_Morning

Ekda Vacha Jarur ..... मुलाच्या वाढदिवशी रात्री दीड वाजता आईने फोन केला. म्हणाली, बाळा, वाढदिवसाच्या शुभेच्छा.... मुलगा वैतागला, म्हणाला , अगं सकाळी करायचास ना फोन ... मुलाने फोन ठेऊन टाकला.... थोड्या वेळाने वडिलांचा फोन आला. आता तो मुलगा रागवला नाही, पण म्हणाला कि बाबा, सकाळी करायचा ना फोन... वडील म्हणाले, मी तुला हेच सांगायला फोन केलाय, कि तुझी आई खरंच वेडी आहे, जिनं तुला वाढदिवसासाठी म्हणून फोन करून तुझी झोपमोड केली. खरतर ती पंचवीस वर्षांपूर्वीच वेडी झालेली आहे, जेंव्हा डॉक्टरानी सांगितले होते, की तातडीनं ऑपरेशन करावं लागेल. ती मरायला तयार झाली, पण तुला जन्म द्यायचाच होता तिला. रात्री दीड वाजता तुझा जन्म झाला बाळा. संध्याकाळी सहा वाजल्यापासून तिला प्रसाववेदनांनी त्रास होत होता. पण तुझा जन्म झाला आणि ती सगळ्या वेदनाच विसरून गेली. डॉक्टरांनी तर आधीच लिहून घेतले होते की जिवाचं काही बरंवाईट झालं तर आम्ही जबाबदार नाही म्हणून... तुझा जन्म सुखरूप झाला आणि तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आज तुला एक रात्री फोन केला तर तुझी झोपमोड झाली. बाळा, तुझी आई पंचवीस वर्षांपासून, मला रोज रात्री दीड वाजता उठवते आणि सांगते, आपल्या बाळाचा जन्म याचवेळी झाला होता बरं का.... फक्त हेच सांगण्यासाठी तुला फोन केला होता, असं सांगून वडिलांनी फोन ठेऊन दिला. मुलगा हे सगळे ऐकून सुन्न झाला. सकाळी तो वडिलांच्या घरी पोहोचला. आईचे पाय धरून त्याने माफीही मागितली. वडील म्हणाले , ती नेहमी म्हणायची, आपला मुलगा आहे, त्यामुळे आपल्याला कसलीही चिंता नाही. आता मी तिला सांगेन जशी आधीपण काळजी घेतली , तशीच तुझी काळजी मी यापुढे घेईन. आई म्हणाली असू द्या हो.... माफ करा त्याला.... आई वडिलांना आपली धन दौलत, संपत्ती नव्हे तर आपले प्रेम हवं असतं. तुम्ही त्यांची काळजीही करावी अशी त्यांची अपेक्षा असतेच. तुम्ही आई-वडिलांना वेळ द्यावा अशी त्यांची इच्छा असते. त्या दोघांचं प्रेम जगात अनमोल आहे. 🍁🙏🍁 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

144 likes 67 shares
WhatsApp