Back to feed
A
Atharv Joshi life · mixed · life

Good evening friends खूप वर्षानंतर माझ्या मित्राची प्रेमिका माझ्या समोर आली कसा आहे रे तो बरा आहे ना आणि त्याचं लग्न झालं की नाही असं विचारायला लागली मी म्हणालो आठवतो का गं तो दिवस तुला तो काहीतरी तुला बोलला होता तू विसरलीस पण तो विसरला नव्हता... काहीही होउदे तुला मी कधी सोडून जाणार नाही मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणावर प्रेम करू शकणार नाही जरी तू मला सोडून गेलीस तरी माझी हरकत नाही कारण तुझ्या सुखाशिवाय मी दुसरा कोणता विचार करत नाही असं म्हणून तो तुझ्या सुखासाठी तुझ्यापासून दूर झाला पण त्याने स्वतःला खूप त्रास करून घेतला मी पण त्याला समजवण्याचा प्रयत्न खूप केला पण त्याने समजून घेतलं नाही त्याला माझा राग आणि काही दिवस मला नाही भेटला ज्यावेळी दिसला त्यावेळी तो मृत अवस्थेत पडलेला सापडला... त्याला माहित होतं हे ऐकल्यानंतर तू रडणार होतीस म्हणून त्याने एकदा माझी नि त्याची भांडणे होण्याच्या अगोदर त्याने काहीतरी लिहून दिलं होतं पण ते मी वाचलं नव्हतं ज्यावेळी वाचलं त्यावेळी तो या जगात नव्हता... भेटेल तुला ती तेव्हा सांग तिला मी जगलो नाही म्हणून रडू नकोस मला नाही आवडणार जगायचं होतं गं मलाही पण ते तुझ्याशिवाय जमलं नाही तू सुखात असताना तुला बोलून त्रास द्यायचं मनाला पटलं नाही तू धोका दिला नाहीस मला माझ्या नशिबाने धोका दिला मला म्हणून मी स्वतःला त्रास करून घेतला पण कधी माझा जीव गेला कळलं नाही शरीर सोडून आत्मा राहिला दुःख तर वाटेल तुला पण माझी इच्छा आहे तू सुखात राहशील नेहमी हसत राहशील फक्त एवढं कर माझ्यासाठी खूप आवडेल गं मला... ते letter वाचत असताना माझ्याहि डोळ्यात पाणी आले तिच्या रडक्या चेहऱ्याकडे पाहून मला काही तिला बोलावेसे वाटले नाही हे ऐकल्यानंतर तीची अवस्था एकदम बेकार झाली ती तेथून न बोलता निघून गेली पण काही दिवसानंतर ती जगाला सोडून गेली हि गोष्ट मला नंतर कळली.... हि प्रेमकहाणी कशी अधुरी राहिली ती मला नाही समजली पण ही मी लिहली आणि माझ्या ह्रदयाला स्पर्श करून गेली..

118 likes 17 shares
WhatsApp