Back to feed
S
Saanvi Reddy Family · Marathi · Family

Hi friends *पुरुषांनाही रडण्यासारखी एक कविता* || *लेक माझी* || ................................................. अशी कशी लेक, देवा, माझ्या पोटी येते नाव सुद्धा माझं ती इथेच ठेऊन जाते।। . पहिला घास, देवा, ती माझ्या कडून खाते माझाच हात धरुन ती पहिलं पाऊल टाकते।। . माझ्याकडूनच ती पहिलं अक्षर शिकते तिच्यासाठी सुद्धा मी रात्र रात्र जागतो।। . कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती गाल फुगवुन बसते मी आणलेला फ्रॉक घालून घर भर नाचते।। . अशी कशी लेक, देवा, माझ्या पोटी येते असे कसे वेगळे हे तिचे माझे नाते।। . एक दिवस अचानक, ती, मोठी होऊन जाते बाबा , तूम्ही दमला का, ? हळूच मला विचारते॥ . माझ्या साठी कपडे, चप्पल, खाऊ घेऊन येते नव्या जगातील नविन गोष्टी मलाच ती शिकवते।। . तिच्या दूर जाण्याने कातर मी होतो हळूच हसून मला ती कुशीत घेऊन बसते।। . कळत नाही मला, देवा, असे कसे होते कधी जागा बदलून ती माझीच आई होते।। . देव म्हणाला, ऐक, पोरी तुझे, तिचे नाते विश्वाच्या ह्या साखळीची एक कडी असते।। . तुझ्या दारी फुलण्यासाठी हे रोप दिले असते सावली आणि सुगंधाशी तर तुझेच नाते असते।। . वाहत्या प्रवाहाला, कोणी, मुठीत कधी, का, धरते ? मार्ग आहे ज्याचा, त्याचा पुढेच असते जायचे। . तुझ्या अंगणातली धारा ही "जीवनदात्री" होते आणि वाहती राहण्यासाठीच "गंगा" ""सागराला" मिळते। एक तरी मुलगी असावी उमलताना बघावी नाजूक नखरे करताना न्याहाळायला मिळावी . एक तरी मुलगी असावी साजिरी गोजिरी दिसावी नाना मागण्या पुरवताना तारांबळ माझी उडावी . एक तरी मुलगी असावी मैचींग करताना बघावी नटता नटता आईला तिने नात्यातली गंमत शिकवावी . एक तरी मुलगी असावी जवळ येऊन बसावी मनातली गुपितं तिेने हळूच कानात सांगावी . 😊😊एक तरी मुलगी असावी गालातल्या गालात हसावी कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी......! *एक तरी मुलगी असावी* dedicated to all beautiful daughters 😊 *खरच ज्याना मुलगी आहे त्यांचे खुप भाग्य आहे...*

194 likes 42 shares
WhatsApp