Back to feed
V
Vihaan Sharma Family · Marathi · Family

I.P.S.विश्वासराव पाटील यांचा अनुभव,,, पेनची नळी!! पुण्याला जात असताना धाब्यावर चहापाण्यासाठी थांबलो ... एक १२ /१३ वर्षाचा साधे कपडे घातलेला चुणचुणीत मुलगा माझ्या मागे मागे रेंगाळत असल्याच जाणवलं .... चहापान झाल्यावर निघालो तेंव्हा माझी नजर त्याला शोधत होती ... गाडीपासून २०/२५ फुटावर झाडाच्या अडोस्याला "तो" उभा होता.. नजर माझ्याकडे. मी त्याला जवळ बोलावलं .. "भूक लागली का?" विचारल तो मानेनच नाही म्हणाला ... माझी उत्सुकता वाढली ... "पैसे पाहिजेत ??" "नाही." "मग.??" पाठीमागे लपवलेली पुष्ट्याच्या प्याड, निबंधाची वही अन रिफील संपलेला रुपयाचा पेन ( use and throw ) त्यान दाखवला. .."पेनची नळी संपली ... घेऊन द्या न ..!!" मी ५ रुपये दिले. तो .."पैसे नको नळी घेऊन द्या" मी म्हटलं "का?" तो "माझी माय म्हणली कुणा कडून फुकटचे पैसे घ्यायचे नाही ....मी जितके फुकटचे पैसे घेइल तितक माझ्या मायच आयुष्य कमी हुइल .!!!! त्याच उत्तर ऐकून माझ्या डोक्यात प्रश्नाचं काहूर उठलं.. माझी माणुसकीची नशा...खाडकन उतरली .. दातृत्वाच ढोंग त्याच्या एका संस्कारापुढे कवडीमोल ठरलं. मी गाडीतून उतरलो ...त्याच नाव विचारल ..बंड्या . बंड्या मला टपरी कडे घेऊन गेला .. पेन घेतल्यावर बंड्या खुलला माझ्या डोक्यातल्या प्रश्नांच्या गुंत्यातून मी एक एक प्रश्न काढू लागलो. . मी :- कितवीत आहेस ? बंड्या:- मराठी ७ वित ... मी :- काय लिहितोस ??? बंड्या :-निबंध... माझी आई !!!! मी :- कुठ राहतोस ? बंड्याने शेताकड बोट दाखवलं ...लांब वर एक झोपडी दिसत होती ..बंड्याचा बाप शेतावर जागल्या होता.. आई शेतावर मजुरी करत होती ..बंड्याला चार लहान भावंड होती. मी वही हातात घेऊन चाळली... बंड्या झेड पी च्या शाळेत होता. त्याच पूर्ण नाव वाचल. अन मग विचारल "माझ्याकडच नळी का मागितली ..?" बंड्या गांगरला .. मी परत विचारल "इथ इतके लोक आहेत मग माझ्याकडच नळी का मागितली.?" बंड्या : "तुमच्याच खिशाला मला पेन दिसला म्हण��

111 likes 70 shares
WhatsApp