Back to feed
A
Aarav Malhotra Life · Mixed · Life

Nice *पूर्वीचा काळ बाबा* *खरंच होता चांगला* *साधे घरं साधी माणसं* *कुठे होता बंगला ?* *घरं जरी साधेच पण* *माणसं होती मायाळू* *साधी राहणी चटणी भाकरी* *देवभोळी अन श्रद्धाळू* *सख्खे काय चुलत काय* *सगळेच आपले वाटायचे* *सुख असो दुःख असो* *आपुलकीने भेटायचे* *पाहुणा दारात दिसला की* *खूपच आनंद व्हायचा हो* *हसून खेळून गप्पा मारून* *शीण निघून जायचा हो* *श्रीमंती जरी नसली तरी* *एकट कधी वाटलं नाही* *खिसे फाटके असले तरीही* *कोणतंच काम रुकलं नाही* *उसनं पासनं करायचे पण* *पोटभर खाऊ घालायचे* *पैसे आडके नव्हते तरीही* *मन मोकळं बोलायचे* *कणकेच्या उपम्या सोबत* *गुळाचा शिरा हटायचा* *पत्रावळ जरी असली तरी* *पाट , तांब्या मिळायचा* *लपाछपी पळापळी* *बिन पैशाचे खेळ हो* *कुणीच कुठे busy नव्हते* *होता वेळच वेळ हो* *चिरेबंदी वाडे सुद्धा* *खळखळून हसायचे* *निवांत गप्पा मारीत माणस*ं *ओसरीवर बसायचे* *सुख शांती समाधान " ते "* *आता कुठे दिसते का ?* *पॉश पॉश घरा मधे* *" तशी " मैफिल सजते का ?* *नाते गोते घट्ट होते* *किंमत होती माणसाला* *प्रेमामुळे चव होती* *अंगणातल्या फणसाला* *तुम्हीच सांगा नात्या मध्ये* *राहिला आहे का राम ?* *भावाकडे बहिणीचा हो* *असतो का मुक्काम ?* *सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी* *कुणीच कुणाला बोलत नाही* *मृदंगाच्या ताला वरती* *गाव आता का डोलत नाही* *प्रेम , माया , आपुलकी हे* *शब्द आम्हाला गावतील का ?* *बैठकीतल्या सतरंजीवर* *पुन्हा पाहुणे मावतील का ?* *तुटक तुसडे वागण्यामुळे* *मजा आता कमी झाली* *श्रीकृष्णाच्या महाला मधुनी* *सुदामाची सुट्टी झाली* *हॉल किचन बेड मधे* *प्रदर्शन असतं वस्तूंचं* *का बरं विसर्जन झालं* *चांगुलपणाच्या अस्थीचं ???* 🙏🏻 कुणाचे शब्द माहित नाहीत चांगली वाटली म्हणून शेअर केली.🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

253 likes 49 shares
WhatsApp