REAL LOVE STORY खरचं खुप प्रेम, करतो गं तुझ्यावर. तिची माझी भेट फेसबुकवर झाली...!! तिच्यासाठीच मी online यायला लागलो कधी नव्हे तो आता दिवसभर बसायला लागलो माझ्या post ला ती खूप कमेंट्स करायची likes करून मला जवळचे ती मानायची .... १ वर्षाने कुठे फोन वर बोलू लागलो कुणाशी नव्हे ते आता तिच्याशीच बोलू लागलो ती आता मला जवळची वाटू लागली तिचेच गाणे आता माझ्या मनात हि येऊ लागले मी कामात असायचो पण तिला करमायचे नाही.... थोड्या थोड्या वेळात मला फोन सारखी करायची कसा आहेस म्हणून मला ती बोलत बस म्हणायची माझे प्रत्येक शब्दावर ती मनापासून हसायची कधी मनास लागले तर ती हुंदक्यात रडायची मग तिला लांबूनच जवळ घ्यायचो उगी उगी म्हणत तिला तू माझी बेस्ट फ्रेंड म्हणायचो .... रडताना खरच ती मला हि रडवायची रडायची ती अन श्वास माझा फुलवायची तिच्या फोन ची मलाही सवयच होती झाली फोनशिवाय तिच्या आता झोपच लागत नव्हती तिची मला जणू आता सवयच लागली होती भेट तिची माझी होईल अशी मला वाटलेही नव्हते माझी होईल ती स्वप्नातही नव्हते दोन वर्षे झाली तेव्हा भेट आमची झाली आता जगत आहे तिच्यासमवेतच… फेसबुक म्हणजे फक्त टाइमपास नव्हे मित्रांनो, इथे पण खरं प्रेम होऊ शकते फक्त ते मनापासून करायला हवे… • खरचं खुप प्रेम, करतो गं तुझ्यावर.
A
Atharv Gupta
friendship · mixed · friendship
75 likes
37 shares