Back to feed
R
Riya Mishra Family · Mixed · Family

Whats App वरून बायकोने बऱ्याच ठिकाणी लपवलेल्या पैशांवरून बरेच जोक्स वाचले... वाईट वाटलं...😑 बऱ्याच पुरुषांच्या उधळपट्टया स्वभावामुळे बायकांची पैसे साठवण्याची सवय फार पारंपरिक आहे .. एखादी अवचित अडचण उभी राहिली तर हेच वेळोवेळी लपवलेलेले किंवा साठवलेले पैसे कामी येतात. त्या खंबीरपणे परिस्थितिला तोंड देतात. आजही मला खात्री आहे कि अनेक पत्नींनी/ स्त्रियांनी अशाच कुठेतरी लपवलेल्या चिल्लर रकमे मुळेच आज बरेच पुरुष रिलॅक्स असणार... 🙏🏼 एक नमस्कार नारी शक्तिला 🙏

48 likes 75 shares
WhatsApp