Back to feed
R
Rohan Bhat Family · Marathi · Family

✒ अत्याचार ✒ पोलिस स्टेशनमधे फोन आला. कचर्याच्या ढिगात एक मृतदेह पडलाय.. पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह ताब्यात घेतला. पोष्टमार्टमला पाठवला. पोलिसांना घटनास्थळी कोणताही पुरावा सापडला नाही... एका अज्ञात खुनाची नोंद झाली.. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला. मृतदेह मुलीचा आहे. वय २० ते २५ दरम्यान असावे. शरीरावर असंख्य जखमा. माराचे व्रण. तीच्यावर सामुदायिक अत्याचार झालेत. तीची किडनी, डोळे गायब आहेत. आणि याहूनही क्रुरता म्हणजे जिवंत असतानाच तीचे अवयव काढले. आणि यातच तिचा मृत्यू झाला. पोलिसांना ही मुलगी कोण ? कुठली ? काहीच माहिती नव्हती... मिसिंग केस तपासल्या. बाकी पोलिस स्टेशनला चौकशी केली. पण काहीच हाती लागले नाही.. अखेर त्या मुलीचा फोटो वर्तमानपत्रात दिला. कोण होती ती? काय झाले तिच्याबाबत? कशी घडली ही घटना? काय शिकवते ही घटना? ते एक सुखी कुटूंब. आई वडील एक मुलगा आणि दोन मुली. घरावर संस्कारांची छाया. वडीलांनी सकाळी उठावे. देवपुजा करावी. दोन्ही मुलींनी वडीलांना साथ द्यावी. घरच आवरावे आणि वडीलांनी कामाला तर मुलींनी काँलेजला निघावे. भाऊ महाशय अजूनही झोपेतच. मुली देवाची पुजा ऐकून तर भाऊ महाशय आईची बडबड ऐकून उठायचे. पण एकंदरीत घरात खेळत वातावरण. एकमेकांवर प्रेम. सुसंस्कारी आणि सुसंस्कृत अस घर... तिन्ही भाऊ बहिणींचा गोंधळ घराला घरपण देत होता.. भाऊ थोडा आळशीच पण तिघेही हुशार... असे हे कुटूंब. पण या घराला कुणाची नजर लागली आणि .... तो काळा दिवस उजाडला. नेहमी प्रमाणे आईने डबे करून दिले. वडील कामाला, थोरली मुलगी काँलेजला आणि धाकटी शाळेत गेली. भाऊसाहेबांचे दुपारी काँलेज . यामुळे ते निवांत होते. .... दुपार झाली. भाऊ काँलेजला गेला. काही वेळा नंतर धाकटी बहिण शाळेतून आली. नंतर वडील कामावरून आले. भाऊ आला. पण पाच वाजता येणारी बहिण माञ आलीच नाही.. येईल एवढ्यात.. बस लेट असेल. लेक्चर असतील. बस मिस झाली असेल. असे एकमेकांना समजावत घरचे वाट पाहत होते... संध्याकाळचे सात वाजले. आठ वाजले. आता माञ शंकेची पाल चुकचुकायला लागली. फोन सुरू झाले. मैञीनींना फोन. जवळच्या पाहुण्यांना फोन. तपास लागेना.. भाऊ काँलेजला गेला. पण चार वाजताच सगळे गेलेत. कोणतेही एक्ट्राचे लेक्चर, क्लास नव्हता. भावाला काय करावे सुचेना. आईने टाहो फोडलाय. बापाच काळीज फडफडतय. पण तसे न दाखवता सर्वांना धीर देतोय. लहान बहिण रडतेय. सर्वांना विचारणा झाली. फोन झाले. आजुबाजुचा भाग पाहिला. कुठे काहीच नाही... राञभर डोळ्याला डोळा नाही. दिवस उजाडला. शेजारची एक मुलगी अशीच गायब झाली आणि कुणासोबत पळून गेली ही गोष्ट ताजी होती. यामुळे तर काळजी अजुनच वाढली. आपण पोलिसांत तक्रार देऊ. पण काय होईल. फक्त आब्रु जाईल. तिला काय कमी केले आम्ही ? काय चुकले आमचे? तिने असे का केले ? अशी पळून का गेली ? लहान बहिणीचा विचार करायचा. आई बापाचा विचार. घरचा, घराण्याचा विचार करायचा. आपली मुलगी निघून गेली. आता पोलिसांत गेले तर आपलीच आब्रू जाणार. मनात असुनही. प्रेम असुनही. लहान मुलीच लग्न आणि घरची आब्रु या भीतीने पोलिसांत तक्रार दिली नाही. एक दिवस गेला. दोन. तीन. चार एक आठवडा गेला. दोन आठवडे.. आणि अचानक पेपरवरील फोटो पाहिला. आपल्याच मुलीचा. बहिणीचा... काय अवस्था झाली असेल त्या कुटूंबाची. रडतच सगळे पोलिस स्टेशनला पोहचले. मुलीची चौकशी केली. ओळख दिली. पण दुर्दैव पहा. बाँडी जास्त सडल्याने पोलिसांनी तीचे अंन्त्यसंस्कार उरकले हो. आता त्या कुटूंबाला फक्त अस्तीचे मडके मिळाले. १५ दिवसापुर्वी आनंदाने गेलेली मुलगी आज एका मडक्यात घरी आली. काय घडली ही घटना? मुलगी काँलेजला गेली. चार वाजता माघारी फिरली. बसची वाट पाहत थांबली होती. तीच्या शेजारी एक मध्यमवयाची बाई आली. बोलणे सुरू झाले. ही बाई चार दिवसापासून बससाठी थांबत होती. दोघींची मैत्री झाली होती. बस आली. दोघी बसमध्ये चढल्या. एकाच सीटवर शेजारी बसल्या. बस थोडी पुढे गेली. बाईने दोन चाँकलेट काढल्या. एक स्वतः खाल्ली दुसरी तीला दिली. कोणतीही शंका न येता तिने खाल्ले. काही वेळात चक्कर यायला लागली. ही बाई घाबरली ? कन्डक्टर गाडी थांबवा. हीला दवाखान्यात न्यायचेय. गाडी थांबली. ती बेशुद्ध होती. बाकीच्या प्रवाशांच्या मदतीने दोघी खाली उतरल्या. बस निघून गेली. आणि मागून एक फोरव्हिलर आली. आतुन तीन तरूण उतरले. बेशुद्ध मुलीला गाडीत घेतले. त्या बाईला २० हजार दिले. गाडी निघून गेली. या नंतर पुढील चार दिवस अत्याचार होत होते. आणि मग तीला वेश्यांच्या बाजारात एका टोळीला विकले. या काळात तिने अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. घरी संपर्क करण्यासाठी धडपड केली. पण व्यर्थ ... ही मुलगी शांत बसणारी नाही. आणि वेश्याव्यावसाय करायलाही विरोध करते. मग काय करावे. हि जिवंत फायद्याची नाही पण हिच्या किडनीचे आणि डोळे, रक्त यातुन पैसा मिळवू... आणि जिवंतपणीच तीचे डोळे, कीडणी, रक्त आणि इतर अवयव काढून घेतले. यातच तिचा मृत्यू झाला. एक निष्पाप जीव गेला... हि हत्या आणि प्रकार थांबू शकला असता का ? मुलीला वाचवता आले असते का? हो. ति वाचू शकली असती. जगली असती... जर तीच्या आईवडीलांनी लगेचच पोलिसांना तक्रार दिली असती. तीचा लगेचच शोध सुरू झाला असता तर, जर त्या अनोळखी व्यक्तीच्या हातून काही खाल्ले नसते तर, थोडीशी सावधानता बाळगली असती तर आज ती जिवंत असती. पण दुर्दैव ??????? आजही ती गुन्हेगार बाई, ते अत्याचारी, वेश्याव्यावसायाला लावणारी टोळी, अवयव काढणारे आणि विकणारे असे कितीतरी नराधम मोकाट आहेत. शिक्षा माञ कुणाला ? आम्ही आपणाला विनंती करतो. एखादी मुलगी चुकीचे वागली याचा अर्थ सगळ्याच मुली चुकीच्या असतात हा आपला भ्रम दुर करा. घरातून मुलगी गायब झाली याचा अर्थ ती पळूनच गेली असे समजणे चुक आहे. असे काहीही घडले तरी त्वरित पोलिसांना कळवा. बाहेरच्या अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट खाऊ आणि घेऊ नका. समाजात विकृत लोक भरपुर आहेत. आपण सावध रहा. आज हजारो मुली गायब होत आहेत, अत्याचारासाठी, घरकामासाठी, परदेशात विकण्यासाठी, आतंकवादासाठी, वेश्याव्यावसायासाठी आणिआणि अवयव विक्रीसाठी मुलींना पळवले जाते. आणि ठारही मारले जाते. यामुळे अखंड सावधान रहा. आपली आणि आपल्यांची काळजी घ्या... हा लेख सर्वांनी वाचा आणी भरपुर फाँरवड करा ।

217 likes 44 shares
WhatsApp