अप्रतिम संदेश पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वा-याने अचानक पडलं. दोघं जणं शब्दं संपल्यासारखे बसून होते. त्याने तिला पंखानी जवळ घेतलं. थरथरत्या पंखानी ती ही कुशीत शिरली. चिमणा - "सकाळी बोलूयात",. चिमणी - "हो" म्हणाली. रात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला. चिमणा उत्साहानी म्हणाला, "निघूया? पुन्हा नव्या काड्या आणू. "तिच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा - "अग वेडे, *पाडणं* त्याच्या हातात आहे तर *बांधणं* आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण *माणसं* थोडीच आहोत! चल निघूया" आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली... यालाच *जगणे* म्हणतात 😊😊😊🐥🐥💐💐🌹🌹 Be positive👍
187 likes
59 shares