Back to feed
M
Manav Mehta family · marathi · family

अशी एक रात्र असावी... अशी एक रात्र असावी जी तिच्या सोबत समुद्र किनारी असावी समुद्र किनारी फक्त आम्ही दोघेच असावं आणि तिथे कोणीच नसावं तिचा हाथ माझ्या हातात असावा आणि आम्ही दोघे एकमेकांच्या नजरेत बघून चालत असावं चंद्राचा तो जगमग्ता प्रकाश असावा आणि तार्यांची ती लवलवाट असावी अशी जणू कि चंद्र आणि तारे आमच्या प्रेम बघून खुश असावे किनार्याला लाटेला मिळण्याची उत्सुकता असावी आणि मिलन होताच दोघांचे एकमेकात नाहून जावं लाटेचं किनार्याला भेटून आम्हा दोघांना स्पर्श व्हावं त्या स्पर्शाने आमचं देखील मिलन व्हावं त्या मिलनात तिचं मला तिच्या घट्ट मिठीत पकडावं असं जणू कधीच न दूर जाण्या सारखं असावं चंद्र आणि तारे देखील आमचं अबोल प्रेम बघून बोलत असावे असं सुंदर मिलन बघण्यासाठी आपण हि जागं रहावं आणि कधीच न निजावं अशीच एक रात्र असावी जी तिच्या सोबत समुद्र किनारी असावी अशीच एक रात्र असावी कि कधीच न संपणारी असावी.....न संपणारी असावी ..... प्रेमवेडा आकाश...

118 likes 89 shares
WhatsApp