Back to feed
M
Manav Kumar Life · Marathi · General

असे ही नाही ,तसे ही नाही कुणाच बद्दल काही नाही... विचारता मज कुणी म्हणाले माहीत नाही काही बाही... वाटायचे अगदी उत्कट ऐसे आता काही नाही... गरज संपता मरतो माणूस आपुले तुपले काही नाही... नाते तुटता रडू येतसे स्पष्ट बोलते,तुसडे नाही... हसणे,फसणे,दिसणे सुंदर भासच केवळ खरे न काही... गळफासला पुरते दोरी आधाराला ती ही नाही... म्हणशी कैसा दूर हो जरा वचने मेलीत?प्रीती नाही? कशास आरश्या वदला तू ही रडका चेहरा पाहवत नाही हसे स्वतःचे करून घेते हसशील का मग थोडे काही?

136 likes 7 shares
WhatsApp