N
Navya Agarwal
Love · Marathi · Heartbreak
असंच राहू दे ना आपलं नातं त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया; आहोत ना एकमेकांसाठी खास मग एकमेकांना घाव नको देऊया! द्यायचंच असेल तर देऊ ओठांवर हसू, कधी उदास असू, तर खुदकन हसता येईल हृदयामध्ये थोडी अशी जागा - जीवनाच्या वाटेवर दमले कधी, तुझ्या सोबतीने बसता येईल पण ज्या छळतील आपल्याला अशा आठवणींचा गाव नको देऊया, असंच राहू दे ना आपलं नातं , त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!! प्रेमात नेहमी दुःखच असते . मग कश्याला त्या दुखाच्या वाट्याला जाउया प्रेम आहे न दोघात हे आपल्या नजरेला कळू दे ना असंच राहू दे ना आपलं नातं त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया! Good morning friends
0 likes
0 shares