आई म्हणजे. . . . . . . लेकरां साठी असते वात्सल्याची मूर्ती मुला करता सत्यात उतरणारी कृती लेकरां साठी भावनांची इच्छा पूर्ति कुटुंबा साठी सतत धगधगणारी क्रांति आई म्हणजे. . . . . .. लेकरां साठी डोळे सदा पाझरती सगळ्या करता अखंड वाहणारी स्फूर्ती आईच्याच कुशीत मिळेल मला मुक्ति मुलीच्या सतत ओठावर असणारी उक्ति आई म्हणजे. . . . .. . मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी युक्ती सगळ्यांना घराची ओढ लावणारी व्यक्ति कितीही संकटे आल्यास लढणारी शक्ति आईची सेवा केल्यास मिळेल मोक्ष्याची प्राप्ती आई म्हणजे. . . . .. . आभाळा येवढी तिच्या मायेची व्याप्ती
239 likes
90 shares