आई वडलांना का जपायचे ??? तीन मिनिटे वेळ असेल तर वाचा !! *************** इतरांपेक्षा आपले एकमेकावर जास्त प्रेम आहे का ? या विचारातून नवीनचं लग्न झालेले जोडपे ठरवते कि, लग्नानंतरच्या पहिल्या दिवशी कोणीही भेटायला आले तरी दार उघडायचे नाही. पूर्ण वेळ एकमेकांना द्यायचा. दोघेही ते मान्य करतात. लग्न होते. दुसरा दिवस उजाडतो. सकाळी सकाळीच मुलाचे वडील त्यांना ब्रेकफास्ट देण्यासाठी म्हणून डबा घेऊन येतात. दार वाजवतात. हाका मारतात. मुलाला कळते कि त्याचे आईवडील आलेत. तो बायकोकडे पाहतो. ती त्याला नजरेनेच आपले काय ठरलेय असे म्हणत "नो" सांगते. नवरा मुलगा शांत बसतो. बाहेर उभे आईवडील कंटाळून निघून जातात. दुपार होते. आता नवरीचे वडील त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन येतात. दार वाजवून हाक मारतात. आता मुलगी आपल्या नवऱ्याकडे पाहते. तोही तिला अटींची आठवण करून देतो. यावर तिच्या डोळ्यात पाणी येते. "मी माझ्या वडिलांसाठी असे करू शकत नाही" असे म्हणत ती पटकन उठते आणि दरवाजा उघडते. नवरा शांत राहतो. *** काही वर्षे जातात. सुखाने संसार सुरु असतो. त्यांना दोन मुले होतात. त्यानंतर तिसऱ्या वेळी मुलगी होते. यावेळी मात्र नवरा आपल्या मुलीच्या जन्माबद्दल मोठ्ठी जंगी पार्टी ठेवतो. यावर मात्र पत्नी विचारते, "काहो ? आपल्याला पहिले दोन मुले झाली, त्यावेळी सगळे मागत असतानाही तुम्ही पार्टी दिली नाही, मग आता मुलगी झाल्यावर का ?" यावर पती शांतपणे म्हणतो, "हीच मुलगी असेल जी कधीकाळी वेळ आली तर माझ्यासाठी दरवाजा उघडेल, ! म्हणून.... " *** हे ऐकून पत्नी निशब्द !!! डोळ्यात पाणी तरळते !!! **** एकच सांगतो, मुलांना आणि मुलींना कि, आई बाप होते म्हणून तुम्ही हे जग पाहू शकताय. त्या एका कारणासाठी तरी त्यांना जपा !!
47 likes
23 shares