Back to feed
A
Aadhya Verma life · marathi · life

आज ती होती..मी होतो, पण नव्हते "ते" प्रेम..अन् "ते" नाते.. भावना ही त्याच होत्या, पण बदलले होते "ते" विचार.. दोघांच्या नज़रा ही त्याच होत्या, पण एकमेकां मध्ये त्या मिळवण्याची "ती" हिम्मत नव्हती.. मनाला आस खुप होती, पण पुन्हा ठेस लावायची नव्हती.. स्वप्ने तशी अनेकच होती, पण ती कधी पूर्ण होणारच नव्हती.. ती समोर असुन ही डोळे तिच्याकडे आज पहात नव्हते, कारण आज तिच्या बरोबर कुणी दुसरेच होते.. डोळ्यात जरी अश्रु नव्हते, तरी मनात मात्र तिचीचआठवण होती.. आज जरी ती देहाने माझी नव्हती तरी हृदयाने सदैव ती माझीच होती.. अनुभूती प्रेमाची अंगावर शिर शिरी तुझे अधर माझ्या अधरा वरी प्रीतीची तुझ्या मोहोर उमटली तू अशी अपाद मस्तक उठले रोमांच नेत्र ही मिटले आपोआप अलौकिक सुख तो ॥ क्षण प्रेमाचा होता आपल्या साक्षीला प्रेम पाहून शांत शांत दिसणारी, अन खूप गोड हसणारी... कधी कधी अबोल, तर कधी कधी खूप बोलणारी... कसल्यातरी विचारात, नेहमीच गुंग असणारी... अन कोणाला ही फक्त एक नझर पाहताच, त्याला भुरळ पाडणारी.................. " तू ".............कोणावरही न चिडणारी, अन सर्वाना समजून घेणारी... स्वतःच दुखः नेहमीच लपवणारी अन त्या चंद्राला हि फक्त, एकटक पाहत बसणारी ................ " तू "............सारयांचया नकळत, त्या चंद्राला हि वेड लावणारी.. घारया डोळ्यात तुझ्या, त्या चंद्राला हि कैद करणारी... चंद्राला हि तुझ्यात, त्याचीच चांदणी दिसणारी... अन तुझ्या इतकी सुंदर, त्याचीही चांदणी असावी.. अस त्या चंद्राला,नेहमीच वाटायला लावणारी.............. " तू " .................फक्त आणि फक्त तू.... आपले होता तो ही भारावला त्याला ॥ पण वाटले असेच थांबावे मिलन आपले कधी न संपाव ॥ कधी न संपाव ||

203 likes 82 shares
WhatsApp