आज देवाचा दिवा लावत होतो सकाळी . दिवा लावला व उदबत्या पेटवल्या . सर्व घरात ठरलेल्या जागी उदबत्या लावल्या . शेवटच्या उदबत्तीने बारीकसा चटका बसला . सहज मनात आल एवढासा चटका सहन नाही झाला पण जेव्हा चितेवर जळत असू तेव्हा काहीही समजणार नाही ! सारा खेळ जीवंतपणीच ! मान कोणाचा ? अपमान कोणाचा ? या नश्वर देहाचा ? या देहात स्वत:च अस काय आहे सांगा बर ? कारण पंचतत्वांकडून उसना घेतलेला हा देह यात जल , अग्नि , वायु , आकाश , पृथ्वी यांच्या मिलनाने बनलेला देह . पाणी 70% , पोटात अग्नि , डोळ्यात तेज , हृदय व पोट वायु , शब्दात आकाश तत्व ! मग कसला गर्व असतो माणसाला ? कोणी खुप शिकतो , कोणी उच्चपदी जातो , तर कोणी रस्त्यावर भीक मागतो . ( भीकारीही उच्चशिक्षीत असतात .) पण हा गर्व काही सुटत नाही . मानापमानाचे नाटक सुरूच रहाते . कोणाला ज्ञानाचा गर्व तर कोणाला पैश्यांचा ! गंमत असते की हे ज्ञानवालेही स्मशानातच दहन केले जातात व पैसे वालेही , पण यांना ना ज्ञान वाचवू शकत ना पैसा ! याचा अर्थ ज्ञान व पैसा प्राप्त नाही करायचे का ? तर उत्तर हो असेच मिळते फक्त त्याचा गर्व नको ! हल्ली दुसऱ्या चुका दाखवून स्वत: किती हुशार आहोत हे दाखवण्याची चढाओढ लागली आहे . प्रत्येक ठिकाणी दुसऱ्याला कमी दाखवण्याची संधी सोडत नाही व दुसऱ्याने आपल्या उणीवा दाखवल्या की राग येतो व अपमान वाटतो ! पण अपमान वाटणारा व अपमान सहन करतोय वाटणारा दोघेही शेवटी विनापरतीच्याच प्रवासाला जातात , तेव्हा या देहाचे काय हाल होतात की , सन्मानाने नेतात हे दोघांनाही समजत नाही ! जीवंतपणी बसलेले चटके विसरले तरच तो माणूस व तीच खरी माणूसकी . मान काय व अपमान काय हा त्या उदबत्तीच्या चटक्यासारखा असतो जो नंतरही व्रण सोडून जातो पण या व्रणाला जो भांडवल न करता बीरूद म्हणून संभाळतो तोच खरा मानव व त्यालाच इश्वराचा मार्ग दिसू शकतो , बाकीचे खेळ करतात " मानापमान " नाटकाचा ! 🌷शुभ सकाळ 🌷
N
Nikhil Verma
Good_Morning · Marathi · Good_Morning
156 likes
57 shares