आज सकाळीच आपण सर्वानी महाड जवळ सावित्री नदीवरील पूल मुसळधार पावसामुळे कोसळल्याची बातमी पहिली /वाचली. त्यात अन्य खाजगी वाहनांसोबतच एसटीच्या २ बसेस चक्क वाहून गेल्याची बातमी येत आहे. राजापूर बोरिवली MH ४० N ९७३९ जयगड मुंबई MH २० BL १५३८ अशा ह्या २ बसेस आहेत. दोन्ही बसेसमध्ये मिळून सुमारे २० प्रवासी व एसटीचे एकूण ४ कर्मचारी [२ चालक व २ वाहक - सर्व रा. प. चिपळूण आगार] आहेत. सदर घटना अतिशय दुर्दैवी असून ह्या घटनेने सर्वांनाच धक्का बसलेला आहे. आपण सर्व एसटीतील सर्व प्रवासी, रा. प.कर्मचारी व अन्य नागरिक ह्यांच्यासाठी प्रार्थना करूयात. एसटीतील प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी प्रशासनातर्फे ०२१४१-२२२११८ व १०७७ हे दोन संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. संपर्कासाठी अन्य क्रमांक रायगड जिल्हा नियंत्रण कक्ष: 1077 मुंबई सेंट्रल बस स्थानक: 022 23074272 / 23076622 महाड बस स्थानक: 02145 222139 / 222102 पोलादपूर बस स्थानक: 02191 240036 चिपळूण बस स्थानक: 02355 252003 / 252167 रत्नागिरी बस स्थानक: 02145 222102/ 222253 राजापूर बस स्थानक: 02353 222029 / 222218 पुन्हा एकदा आपण सर्व मिळून सर्वजण मिळून एसटी कर्मचारी, प्रवाशी व अन्य नागरिकांसाठी प्रार्थना करूया. धन्यवाद
138 likes
28 shares