आजकाल टिव्ही वर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत की रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय? 😀😀😀 जेव्हापासून बुलेट मध्ये Self Starter आले आहे तेव्हापासून एका झापडीत खाली पडणारे लोक सुद्धा बुलेट घेऊन फिरायला लागले आहेत 😀😀😀 हरवलेलं प्रेम एक वेळा परत मिळेल पण गाडी पुसायचा फडका कधीच परत मिळणार नाही. फडकी चोर साले 😀😀😀 मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय, पर्वा शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता 😀😀😀 मिटिंग मध्ये बॉसच्या जोकवर तोच जोरात हसतो ज्याचा EMI सर्वात जास्त असतो 😀😀😀 आमच्याकडे एक इंजिनियर आहे त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य, “साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात” 😀😀😀 बायका फार नशीबवान असतात कारण त्यांना बायका नसतात 😀😀😀 हे एक गोष्ट खरी आहे हा… जगात सर्व माणसांची वेगवेगळी नवे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए माकडा” तेव्हा १५ पैकी १२ जण तरी मागे वळून पाहणारच 😀😀😞 अॅक्टीवाच्या सायलेंसरवर बायकोचं नाव लिहिलं तर “बुलेट” चा आवाज येतो म्हणे…. 😀😀😀 बाबा : आजपर्यंत तु असं काही काम केलंस का ज्याने माझी मान वर होईल? मुलगा : एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच? 😀😀😀 लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते 😀😀😀 I-Phone 7 हा लगातार सातवा असा फोन आहे जो आपल्याकडं नाहीय 😀😀😀 मुलगी : तुझी आठवण येतेय मुलगा : अजून पगार झाला नाही मुलगी : अच्छा चल बाय 😀😀😀 तुमचा बेस्ट फ्रेंड जर चुकिच्या मुलीच्या प्रेमात पडला असेल तर त्याला अडवू नका कारण अक्कल बदाम खाल्ल्याने नाही धोका खाल्याने येते 😀😀😀 त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या. ज्या सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या – सर आज तुम्ही गृहपाठ चेक करणार होता ना? 😀😀😀 “बघून घेईन” म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा “घेऊन बघतो” म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा 😀😀😀 काय दिवस आलेत… चौथी पाचवीची पोरं प्रेमाच्या गप्पा मारतायंत.. आणि तरुण पोर pokemon पकडत फिरतायंत 😀😀😀 समस्त स्त्री जातीला पडलेला एक गहन प्रश्न – पुरुष तर कधीच उपवास करत नाहीत तरीही त्यांना आपल्या सारख्या चांगल्या बायका कशा मिळतात?? 😀😀😀 सर्वच आईवडिलांचा सर्वात सुंदर डायलॉग – डोकं तर खूप आहे त्याला पण तो अभ्यासच करत नाही 😀😀😀 काही लोक नाकात बोट घालून बोट असे पाहतात की जसे नाकातून हिरा निघालाय 😀😀😀 ज्यांचे पुण्य अपार असते … त्यांच्या बायकोचे माहेर किमान ३०० किलोमीटर दूर असते 😀😀😀 लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे तीस मर खान येउद्यात हवा फक्त त्याचीच होते जो झोपून नागीण डान्स करतो. 😀😀😀 भारत सरकारचा नवीन नियम ज्यांचा मोबाईल कँमेरा २ मेगा पिक्सेल आहे अशांना दारिद्र रेषेखालील घोषित करण्यात येईल 😀😀😀 एक माणूस मच्छिवालीला : ए मावशी या सुरमई मध्ये गाबोळी (अंडी) आहेत का? मच्छिवाली : ए बाबा, मच्छि वजन करून देतात, सोनोग्राफी करून नाही 😀😀😀 आयुष्यात कधी पाय डगमगला, कधी पडलो पण हिम्मत नाही हरलो पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला, “वेटर, अजून एक खंबा आन” 😀😀😀 तुम्हाला माहित आहे काय पॉपकॉर्न कढईत ठेवल्यावर उड्या का मारतात? स्वतः गरम कढईत बसून पहा, मग आपोआप समजेल 😀😀😀 बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे पुरुषांचे काय…. बायका दिसल्या की खुश होतात 😀😀😀 व्यायाम करणे, ड्रिंक्स न घेणे व शाकाहारी राहणे ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्ष नक्की वाढतील पण लक्षात ठेवा की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरुणपणातली नव्हे 😀😀😀 बासुंदीचा फुल फॉर्म सापडला : बाई सुंदर दिसते 😀😀😀 ATM मधून २०० रुपये निघताना इतका आवाज होतो की असं वाटतं की चुकून ४-५ हजार निघतात की काय… 😀😀😀
R
Reyansh Malhotra
love · mixed · romantic
208 likes
5 shares