Back to feed
A
Asha Gupta humor · marathi · humor

आजोबांचा *शतकामहोत्सवी वाढदिवस* होता. केक कापला , टाळ्या झाल्या. सगळं हॅपी हॅपी झालं . पण आजोबांच्या *शतकाचं गूढ* सगळ्यांना हवं होतं. आपल्या *शहाण्णव* वर्षांच्या सडपातळ *पत्नीची अनुज्ञा* घेऊन आजोबा सांगू लागले... माझ्या पंचविसाव्या वर्षी माझं *लग्न* झालं. लग्नानंतर आम्ही वेगळे राहू लागलो. काहि दिवसांनी आमच्यात तुमच्यासारखी *भांडणे* होऊ लागली. सततच्या भांडणाला कंटाळून आम्ही दोघांनी एक *निर्णय* घेतला.. ज्याची *चूक* असेल त्याने घराबाहेर पडायचे व *पाच किमी* चालून परत यायचे. तेंव्हापासून मी दररोज पाच किमी चालत आलो आहे. 🤣 *माझ्या उत्तम तब्येतीचे हेच गुपित आहे !* "अहो पण , *आजी देखील स्लिम* आणि *ठणठणीत* आहेत की , त्याच काय ? "🤔 आजोबा म्हणाले , माझ्यावर *विश्वास* नसणे हेच तर भांडणाचे *कारण* असे. मी पाच किमी चालत जातो की वाटेत पुढे कुठे जाऊन बसतो हे पाहण्यासाठी ही सुद्धा माझ्या पाठोपाठ येत असे , *त्यामुळे तिचीही तब्येत ठणठणीत आहे !* 😁🙂😁🙂😁🙂😁🙂😁 😜😜😜😅😅😅😂😂😂

192 likes 48 shares
WhatsApp