Back to feed
R
Riya Mehta Family · Marathi · Family

*आपल्या गुरुजनांवर विनोद पाठविण्यापूर्वी, एकदा खालील कविता वाचून, मग काय ते ठरवा...!* *॥ शिक्षक ॥* *शाळांना जर का "शिक्षक"* *लाभला नसता...* *तर आयुष्याच्या गणिताचा* *भूगोल झाला असता. ॥ १ ॥* *फळयावर जर खडूचा* *हात फिरला नसता* *तर....अ ब क ड , बाराखडीचा* *अर्थ कळला नसता. ॥ २ ॥* *डोळे भरून येतात जेव्हा* *हातात पगार येतो.* *गुरूजी तुम्हीच आकार दिला,* *जेव्हा मातीचा मी गोळा होतो. ॥ ३ ॥* *पायथागोरस, आर्किमिडिज,* *न्यूटनअजूनही तोंडपाठ* *आहेत गुरूजी.* *तुम्ही शिकवलेल्या पाण्याच्या* *रेणुसूत्रात मला तुम्हीच* *दिसता गुरूजी. ॥ ४ ॥* *तुमच्या हातून खाल्लेला मार* *आजपर्यंत विसरलो नाही मी.* *घोड़ी करुन उभे करायचात तुम्ही* *आता तीच पद्धत व्यायामाला वापरतो मी. ॥ ५ ॥* *शाळा चुकवायचो कित्तेकदा* *उनाडक्या करतांना.* *पण भीती वाटायची तुमची* *गृहपाठ तपासतांना. ॥ ६ ॥* *आज मात्र तुम्ही सोशल साईटवर* *चेष्टेचा विषय झालात* *मास्तर कोमात; गुरूजी जोमात.* *मास्तर पळाला; यात्रेला गेला.* *॥ ७ ॥* *असल्या कमेंट्स,* *जेव्हा लोक करतात.* *काळीज फाटतंय हो गुरूजी* *आमचे आदर्श रोज मरतात. ॥ ८ ॥* *तुमची प्रतिमा मात्र माझ्या* *हृदयात आदरणीयच राहील.* *मी साक्षर फक्त तुमच्यामुळे झालो.* *ही जाणीव माझ्या मृत्यूपर्यंत राहील. ॥ ९ ॥* सर्व गुरुजींना समर्पित...

99 likes 76 shares
WhatsApp