S
Saanvi Patel
love · marathi · romantic
आपल्यात होऊन गेलेले क्षण मला आता नेहमी आठवत राहतील तुझ्या माझ्या प्रेमाला आता स्मृतीच्या बंधनात बांधत राहतील स्मृतीतला प्रत्येक क्षण माझा आता फक्त तुझ्यासाठी असेल आठवणीत डोळ्यांत आलेला माझ्या अश्रुंचा प्रत्येक थेंब फक्त तुझ्यासाठी असेल ओघळून देईल मी त्या डोळ्यांतुन येणा-या प्रत्येक थेंबाला कारण त्या प्रत्येक थेंबात माझं प्रेम फक्त तुझ्यासाठी असेल स्मरतात आता मला ते क्षण जे फक्त स्मृतीतचं उरलेत ह्रदयावरच्या घावांना ते आता रोज नव्याने ताजे करतेतं
195 likes
53 shares