Back to feed
M
Myra Kumar friendship · marathi · friendship

आभार मानण्याचे काहीच कारण नाही..? बस गच्च भरली होती. आता ती सुरु होणार तोच ड्रायव्हरम्हणाला, “गाडीचा टायर पंक्चर आहे” ताबडतोब कंडक्टर उतरला. त्याच्या मागोमाग गण्या उतरला, दोघांनी मिळून गाडीचा टायर बदलला, बस सुरु होण्यासाठी सज्ज झाली. कंडक्टर गण्याला म्हणाला, “मी तुम्ही केलेल्या मदती बद्दली तुमचा आभारी आहे. आजकाल लोक एस.टी.वाल्यांना अजिबात मदत करीत नाहीत, पण साहेब तुम्ही स्वतः गाडीखाली जाऊन टायर चढवला. हातपाय , कपडे खराब करून घेतलेत. मी खरच खूप आभारी आहे. गण्या म्हणाला,” मित्रा, आभार मानण्याचे काहीच कारण नाही . माझी बायको १० वर्षा नंतर माहेरी जातेय, ती याच बस मध्ये आहे, टायर पंक्चर झाल्या मुळे माहेरी जाण तीच रद्द होऊ नये म्हणून केली हि सगळी खटपट.

218 likes 51 shares
WhatsApp