आयुष्य झालंय Busy तरी ,नात्यांमध्ये अजूनही "ओढ "आहे.... कोणी दाखवत उघड उघड ,काहींचा Silent mode आहे.... बरीच एकटी मनं आज Mobile मुळे रमतात.... न भेटताही गप्पांचे अड्डे , Whatsapp कट्ट्यावर जमतात... दूरदेशी गेलेल्या मुलाशी "Skype" मुळे chat होतो... विरहाच्या दुःखाचा एक क्षणात Format होतो.... हजारो मैलांची अंतरे, एका बटनाने मिटतात, गणपती,दिवाळीला भेटणारे भाऊ -बहीण, रोज "Group" वर भेटतात.... शाळा संपते,अन मित्र-मैत्रिणींच्या आठवणींना पूर येतो.... Facebook वर एक "Search"ने हाही Problem दूर होतो... काही समस्या Upload करताच, Solution सहज Download होतं... कठीण वाटणारं आयुष्याचं कोडं सहजपणे "Decode" होतं.... Internet च्या जाळ्यामुळेच , आपण दूर असूनही "Close" आहोत... भेटू वर्षातून एकदा कदाचित पण सोबत "Online" रोज आहोत....
224 likes
14 shares