A
Aadhya Kulkarni
Friendship · Mixed · Friendship
आयुष्यात खुप लिहावस वाटतय, पण वाचायला कोणी नाही.... आयुष्यात खुप बोलावस वाटतय, पण ऐकायला कोणी नाही.... डोक्यात खुप काही चाललयं, मनाची घालमेल होतेय, पण समजुन घ्यायला कोणी नाही.... खुप व्यक्त व्हावस वाटतय, बरचं Share करावस वाटतय, प्रत्येक जण व्यस्त प्रत्येकाच्या आयुष्यात ,कोणाकडे पाहायला वेळ नाही.... झाल्या खुप सार्या चुका, साथ गेले सोडुन बरेच, पण माफ करायला कोणी नाही... चांगल्या कामाचं कौतुक करायला कोणाकडे वेळ नाही, पण वेळ जेव्हा टिका करायची येते तेव्हा सर्व सदैव तयार.... दुसर्याना समजुन घेता घेता, हसवता हसवता, माझा विदुषक केव्हा झाला कळळेच नाही....
202 likes
81 shares