Back to feed
A
Ayaan Patel Family · Marathi · Family

*आरक्षण* ऐवढीशी झोपडी आमची तुमचा माळ्यावर माळा फक्त आरक्षण आहे आमच्या कडे त्याच्या वरही तुमचा डोळा हातावरती पोट आमचे पाठी वरती विळा आजुनही बाप राखतोय तुमचाच मळा फक्त आरक्षण आहे आमच्याकडे त्याच्यावरही तुमचा डोळा फुटका मनी नाही आईला माझ्या जसा लंकेच्या पार्वतीचा गळा गावभर फिरतात पाटिल तुम्ही घालुनी पच्यास तोळा लोकशाहीच्या युगात तुमचा राजशाही थाट लग्नाला केला खर्च भरमसाठ तुमच्या लेकीच बघुण लग्न सोहळा दिपुन गेला माझा डोळा फक्त आरक्षणच आमच्याकडे पन तुमचा त्याच्यावरही डोळा साखर सम्राट शिक्षण सम्राट गल्ली पासुन दिल्लीला तुमचाच लळा तुमच्या चार पिढ्या पदवी धर आम्ही आताशी शिकतोय शाळा फक्त आरक्षण आहे आमच्याकडे पण तुमचा त्याच्यावरही डोळा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

205 likes 24 shares
WhatsApp