Back to feed
S
Sahil Bose Family · Marathi · Family

✍🏿🎯*आरक्षण अगदी मनातलं मांडलत* 🚩प्रत्येक सुद्न्य मराठा समाजाच्या बांधवाने शांतपणे विचार करावा ... नक्की पटेल 👍 एट्रोसिटी कायदा कसा वाईट आहे याच जस दिवस रात्र रडगाण चालु आहे अगदी तसच आता आरक्षण किती वाईट आहे हे सांगण्या साठी सकल समाज एकवटल्याचे जाणवते. आरक्षणा मुळे कशा प्रकारे 90% वाला भाऊ घरी आहे हे सांगितल जातय. आमच्या समाजाची जी काही अधोगति झाली ती फक्त आणि फक्त आरक्षणा मुळेच झाली अस final conclusion काढलय. खरं तर sc/st च्या हक्कावर/हिश्यावर कुणी डाका मारू नये म्हणून केलेली कायदेशीर व्यवस्था म्हणजे आरक्षण होय. अन्य व इतरा पासून हक्क अधिकाराचे रक्षण म्हणजे आरक्षण. बर हे आरक्षण आहे तरी किती? ते का भेटत याचा विचार कोणी करत नाही. आला मेसेज केल फॉरवर्ड.. वाईट आहे म्हणजे आहे बस विषय संपला. थोड़फार सरकारी नोकऱ्यांकड पाहिल तर महाराष्ट्रात किती सरकारी नोकऱ्या आहेत? MPSC जी जवळ पास सगळ्यांना परिचीत असणारी संस्था आहे जी दरवर्षी जागा काढ़ते. बर यात जागा किती निघतात? आता सेल्स टॅक्स च्या जागा आल्या. त्यात SC ला किती असतील? फक्त 1 जागा. ओबीसी ला किती? त्यांना ज़रा जास्त आहेत, 2 जागा आणि ओपन ला जागा किती? त्यांना 37 जागा आहेत. मग इथे त्या 1 जागेसाठी कोण्या ओपन केटेगरी वाल्या पोराच नुकसान झाल का? 2014 ला उपजिल्हाधिकाऱ्याच्या 44 जागा आलेल्या. त्यापैकी ओपन ला 21, SC ला 3 आणि ओबीसी ला 7 जागा मग इथे 3 जागांमुळे कोणता 90% वाला स्कॉलर अडून राहिला का? बर कटऑफ चा विषय असेल तर ओपन आणि SC मध्ये असा कितीचा फरक आहे? 3 मार्क्स चा फक्त. हीच गोष्ट भूमिलेख उपअधीक्षक साठी एकूण 19 जागा त्यातल्या ओपन ला 13 जागा. SC ला 1 आणि ओबीसी ना झीरो आता कर सहाय्यक ची मोठी जाहिरात आली एकूण 450 जागा आहेत. त्यात एकट्या ओपन साठी 250 जागा आहेत. SC ला 56 आणि ओबीसी ला 80 आणि भटक्या विमुक्तांसाठी 8 आणि 5 अशा जागा आहेत. PSI पदासाठी 828 जागांची भरती झाली त्यात एकट्या ओपन ला 642 जागा, SC ला 17 ओबीसी ला 21 आणि NT ला 1 जागा. एकट्या MPSC ने 2014 या वर्षात एकूण 668 जागा काढल्या त्यात SC ला सगळ्या मिळून 70 जागा सुद्धा न्हवत्या. मग 70 जागांमुळे तुमचे किती 90% वाले घरी बसले? बर हे झाल MPSC च बाकीच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये यापेक्षा वेगळ चित्र नाही. आता हे महाराष्ट्रा पुरत झाल. देश पातळीवर वर पण हेच आहे. भारतातील सरकारी बँकांसाठी IBPS नावाची संस्था सामूहिक परीक्षा घेते. यावेळी एकूण 8822 जागा आहेत त्यापैकी 4500 जागा ओपन ला SC ला 1338 आणि ST ला 600 जागा आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये पण हेच आहे. 2014 ला बॅंकेच्या लिपिक पदासाठी 3500 जागांपैकी ओपन ला 1500 जागा आणि SC ला 300 जागा. इथे तर सगळ्यांसाठी कटऑफ एकच आहे. मेडिकल व इंजिनियर ची ओपन व आरक्षित कटऑफ मागील 5 वर्षाची बघा. बहुतेक सारखीच आहे ******* एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्या सरकारी नोकऱ्या पकडून 1500 च्या पुढे पण जागा निघत नाहीत. या 1500 पैकी SC ला जास्तीत जास्त 100 जागा असतील. मग या शंभर लोकांमुळे सकल समाजाच नुकसान झाल का? या 100 पोरांमुळे किती 90% वाले घरी बसले आहेत? तुमच्या अधोगतिला या 100 जागा कारणीभूत आहेत का? आरक्षणाचा गैरफायदा कसा होतो नेमका? गैरफायदा होत असता तर एकपण ओपन वाला सेलेक्ट झाला नसता. सगळे SC, ST, OBC आज सरकारी नोकऱ्यांमध्ये घुसले असते. हिथ ते त्यांच्या राखीव 100 जागांमध्ये लढत आहेत. तुम्ही तुमच्या 1000 जागांमध्ये लढा. सिंपल आहे याचा एवढा मोठा इशू करण्याच कारण नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा एकट्या महाराष्ट्रात SC मध्ये एकूण 59 जाती येतात ST मध्ये 47 VJ मध्ये 14 आणि ओबीसी मध्ये 346 जाती येतात. आता विचार करा त्या सेल्स टॅक्स इंस्पेक्टर च्या 1 जागेसाठी 59 जाती लढत आहेत. त्या 2 जागेसाठी ओबीसी च्या 346 जाती लढत आहेत, किती जीव घेण कॉम्पिटेशन आहे. आणि तुम्ही आम्हाला अगदी सहज फुकटे म्हणुन हिनवता. आता ज़रा प्राइवेट कंपन्यांकड पाहिल तर दिसून येईल की तिथ महिन्याला लाखो जागा उपलब्ध असतात. यावर्षी गवरमेंट ने 60 लाख रोजगार उपलब्ध करणार असल्याच जाहिर केलय आणि भारतातल्या IT, Finance, Engineering या क्षेत्रात प्रचंड नोकऱ्या उपलब्ध आहेत. इथे कोणतच आरक्षण उपलब्ध नसत. इथ फक्त आणि फक्त मार्क्स च्या जोरावर पोर लाखांचे पैकेजेस घेतात. मग तुमच दुखन नेमकं कोनत आहे? 100 जागांमुळे सगळा समाज अधोगतिला जातो का? मुळात आरक्षण हे मागास लोकांना विविध क्षेत्रात प्रतिनिधि स्वरुपात पाठवन्याची व्यवस्था आहे. आरक्षण म्हणजे एक मार्ग आहे खैरात नाही. कोणी SC, ST वाला दिवसरात्र झोपा काढून कलेक्टर होत नाही त्याला पण तेवढीच घासावि लागते. आता परिक्षांसाठी सर्वांना सामान फी असावी ही मागणी योग्य आहे. SC ला 100 तर ओपन ला पण 100 ठेवली तर काही बिघड़नार नाही. पण काही हुशार लोकांना हे मान्य नाही. त्यांच्या मते सरसकट SC,ST ला 600 रूपये फी करा. म्हणजे किती उदात्त विचार आहेत यांचे. आरक्षणा निमित्ताने इथे फेसबुक वर तर किती राळ उठली? एक गृहस्थ म्हणले माझ्या वडिलांनी त्यांच्या पेक्षा वयाने कमी असणाऱ्या एका शिक्षकाच्या हाताखाली काम नको करायच् म्हणुन राजीनामा दिला. ही गोष्ट खरच अभिमानस्पद आहे का? कवियत्री म्हणवणाऱ्या मुली, अभ्यासु वाटनारे गृहस्थ अगदी सगळ्यांचे भाऊ, बहिण, मुल आरक्षणामुळे घरी बसून आहेत. टीवी वर बोलणाऱ्या मुलींच् तर काय बोलाव? तिथे तर A to Z मागासवर्गीय मुलींचे बाप हे गर्भश्रीमंत आहेत. आणि त्या सगळ्या मागासवर्गीयांना मुलींना मोजून 50% पडले असून ते परदेशात MS करत आहेत. तर त्याच वेळी सरसकट सगळ्याच सवर्ण मुलींचे बाप अगदी कफल्लक आहेत. आणि त्यांच्या मुली 90% पाडून पण घरी आहेत. हे सगळ कशामुळ? फक्त आणि फक्त आरक्षणामूळ!! वाह रर पठ्ठे __/\__ही मनुवादी मानसिकता बदलावी लागेल. बाबासाहेबांचा मानवतावाद स्वीकारावा लागेल तरच आपला समाजाचा व देशाचा उद्धार होइल. 🙏🌹🐘🌹🙏

101 likes 86 shares
WhatsApp