R
Reyansh Pawar
rain · mixed · rain
आहेस तरी कोण तू? जाणिवेची जाण तू, मानाचा अभिमान तू, मेणबत्तीची मेण तू, आहेस तरी कोण तू? दुष्काळातला पाऊस तू, गरिबांची हौस तू, बेघराचं होम लोन तू, आहेस तरी कोण तू? नारळातलं पाणी तू, दिवसातली रातराणी तू, लेखकाचा पेन तू, आहेस तरी कोण तू? ओसाड जमिनीची हिरवळ तू, जगण्याची तळमळ तू, silent मोड ची रिंगटोन तू, आहेस तरी कोण तू? उन्हाची सावली तू, चिमुकलीची बाहुली तू, निष्पर्ण झाडाचं पान तू, आहेस तरी कोण तू? उगवता सुर्य तू, युद्धातलं शौर्य तू, धनुष्याचा बाण तू, आहेस तरी कोण तू? जगण्याची आशा तू, जिभेवरची भाषा तू, मनातली माझ्या आठवण तू, आहेस तरी कोण तू? ❣️💖💖❣️❣️💖💖❣️💖❣️❣️💖💖❣️❣️💖💖❣️💖
152 likes
69 shares