Back to feed
A
Aditya Chauhan humor · marathi · humor

इंजिनियरिंग करणारा बन्या सततच्या तणावामुळे वैतागला आणि त्याने सरळ आत्महत्येचा निर्णय घेतला. तडक त्याने स्टेशन गाठलं आणि रेल्वेरुळात पडला. दुरून ट्रेनचा आवाज आला. ट्रेन त्याच रुळावरून येत होती. बन्या ट्रॅक मध्येच होता. रुळ धडधडू लागले. ट्रेन आणि बन्या मधलं अंतर कमी होऊ लागलं. ट्रेन जवळ आली. . . . . . आणि इतक्यात बन्या चटकन उठून बाजूला झाला. म्हणाला, "नाही च्यायला, उद्या सबमिशन आहे !!

131 likes 51 shares
WhatsApp