Back to feed
S
Shaurya Bose shivaji · marathi · shivaji_pride

एका ओळखीच्या ठिकाणी सत्यनारायणाची कथा चालु होती, आरती झाल्यावर. माझ्या समोर आरतीची ताट आलं..नमस्कार करुन मी आपल्या खिशातुन दहा रुपयाची फाटकी नोट त्याताटात अशा प्रकारे ठेवली की कुणी पाहीलं नाही.गर्दी खुप होती,त्या गर्दीचा फायदा घेत फाटकी नोट चालवल्याचा आंनद झाला... तेवढ्यात त्या गर्दीतुन माझ्या मागे असणाऱ्या काकुंनी माझ्या खांद्यावर थाप मारली आणि 2000रु.नोट माझ्या हातात दिली....मी ती नोट घेतली आणि त्या आरतीच्या ताटात टाकली.ती 2000 ची नोट बघून आपण फक्त दहा रुपयेच टाकले या गोष्टीची थोडी लाज पण वाटली,बाहेर जाताना त्या काकुंबद्दल थोडा आदर वाटला म्हणुन मी त्यांना नमस्कार केला.त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही दहा रूपयाची नोट काढताना तुमच्याच खिशातुन 2000 रुपयेची नोट खाली पडली होती ती तुम्हाला मी परत देत होते... हे देवा.......🤦🏼‍♂🤦🏼‍♂ 😅😒😒😟😥😭😭😭😭😭 बोला सत्यनारायण महाराज की जय

44 likes 54 shares
WhatsApp