एक चांगला मेसेज पाठवला आहे कोणा चा आहे माहित नाही चांगला आहे शेयर करीत आहे आयुष्य...एक चकवा.. आज दोघंही खूपच आनंदात होते.. पुण्याहवाचन करण्याची खूप इच्छा होती. पण मुलांच्या रूटिनमध्ये व्यत्यय नको म्हणून एकत्र मानसपूजा केली. लगबगीनं आपापल्या वाटणीची कामे आटोपली. मुलांना, नातवंडांना सरप्राइज द्यायचं ठरवून दोघंही संध्याकाळीच घराबाहेर पडले... "आता कळवू मुलांना.." उतावीळ होऊन तिनं विचारलं, अन् होकाराची वाट न बघताच मोबाइल काढला.. तोच मुलाचा फोन वाजला. "टेलिपथी!" म्हणतच तिनं आनंदानं फोन घेतला. काही बोलण्यापूर्वीच तिकडून मुलानं निरोप दिला.. "आई, आज आमचा स्वयंपाक नको करूस हं...हिची मैत्रिण खूप वर्षांनी भारतात आली..तिच्यासोबत डिनरला जायचेय..मुलंही चलणार अाँटीला भेटायला...तुम्ही जेवून घ्या हं...आणि हो..औषध - गोळ्या घ्यायला विसरू नका हं..बाय." काहीही न बोलता तिनं फोन ठेवला.. तो किंचित हसला. म्हणाला, "मुलांचा कार्यक्रम ठरलाय नं?" तिनं मान हलवली.. तो उदासला. म्हणाला, "आता? ह्या सरप्राइजचं काय?" "आपलंच सरप्राइज..आपणच एंजॉय करायचं.." त्याचे डोळे भरले.. पण ती शांतच.. "चल घे..." रात्री मुलाची व्हॉट्सऍप पोस्ट आली, "आम्ही पोहोचलो.. तुम्ही लवकर या.." आईनं पोस्ट टाकली, "तुम्ही झोपा." मुलानं पुन्हा विचारलं, "तुम्ही कुठे?" आईनं दोघांचा हॉटेलमध्ये अरेंज केलेल्या डिनरचा फोटो टाकला.. "त्या" दोघांच्या मागे असलेले Happy Anniversary चे सुंदर कट-आउट पाहून मुलगा दणकलाच. त्यानं थेट फोन लावला, "आई, तुम्ही कोणत्या हॉटेलात आहात? मी येतोय." आई शांतपणे म्हणाली, "असू दे, बाळा. आम्ही हॉटेल सोडलंय.. आणि हो.. आज आम्ही घरी येणार नाही.. लोणावळ्याला निघालोय.. तुम्ही शांतपणे झोपा.. आणि हो.. बाबांचं नेहमीचं दरवाजे लावण्याचं काम आजच्या दिवस करून घे हं. सर्वांना आजच्या विशेष दिवसानिमित्त विशेष आशीर्वाद सांग... बाय." मुलानं पुन्हा व्हॉट्सऍप उघडला. भरल्या डोळ्यांनी वाचलं, "50th Wedding Anniversery". त्यानं हळूच तिचा हात हातात घेतला. डोळ्यांच्या कडा पुसत ती म्हणाली, "जीवन म्हणजे चकवा असतो, नाही ? फिरून त्याच जागी आणणारा. वैवाहिक जीवनाची सुरवात आपण दोघांनीच केली होती नं? आजही आपण दोघंच उरलोयत.." ..... आवडले म्हणून जसेच्या तसे आपणांसी धाडले. 🙏🙏🙏
257 likes
12 shares