Back to feed
M
Myra Mehta Family · Marathi · Family

एक चांगला मेसेज फॉरवर्ड करीत आहे 😆😀😄😜😂😃 " आनंद" अगं माझा चश्मा कुठे आहे..? अहो तुमच्या डोळ्यावरच आहे की.... अशी गंमत झाल्यावर मिळणारा *आनंद!* .. बाप होण्यापेक्षाही... आजोबा/आजी होण्याचा *आनंद!* .. चहात साखर किंवा भाजीत मीठ विसरलेले असतानाही, न बोलता... मिश्किलपणे संपवून टाकण्याचा एक *वेगळाच आनंद!* .. नातवंडाच्या कृपेने अंगावरील कपडे ओले झाल्याचा *वत्सल आनंद !* आणि त्यांनी केलेले हट्ट पुरविण्याचा *गोड आनंद!* .. सूनेने न मागता आणून दिलेल्या चहाचा व औषध घेतले का..? या प्रेमळ चौकशीचा *मोठा आनंद!* .. वाढदिवसाला मुलाने दिलेल्या शालीचा.... *ऊबदार आनंद!* .. आपण कुटुंबाला हवे आहोत...... या भावनेचा *सुप्त आनंद!* .. दातात अडकलेल्या मक्याच्या कणसाचा कण निघाल्याचा सुद्धा..... *आनंदच!* .. दुपारी जेवणानंतर पेपर वाचता वाचता लागलेली डुलकी ... *परमानंद. !* .. बाहरे छान पाऊस पडतोय.. हवेत हवाहवासा गारवा... आणि हाती पडावी गरमागरम भजी.. *स्वादानंद!* .. रात्रीची निरव शांतता.. आराम खुर्चीवर डोळे मिटून पहुडलेल्या क्षणी.. आपली आवडती गझल.. रेडिओने गुणगुणावी... *स्वर्गीय आनंद!* .. एखादी कविता किंवा लेख आपण पोस्ट करावा.. मित्रांनी त्याला भरभरुन दाद द्यावी... *साहित्यानंद!* .. मनातल्या निरनिराळ्या शंका कुशंका.. मन अशांत अशांत झालंय आणि देवघरातल्या भजनामुळे सारे सांवट दूर व्हावे.. *कैवल्यानंद!* .. मित्रांच्या साठीशांती समारंभाचा आनंद... तिथे भेटलेल्या जुन्या सवंगड्यांमुळे होणारा... *अपार आनंद!* कधीकाळी सरकारी कृपेने महागाई भत्त्यात वाढ होऊन तीनचारशे रुपये जास्त पेन्शन हातात पडली की होणारा.. *आर्थिक आनंद!* .. सर्वांनी सारे सारे नकारात्मक विचार सोडून दिले की मिळणारा.... *निर्भेळ "आनंद"!* .. आणि या सर्व आनंदाची बेरीज करून ती मनाच्या कप्प्यात साठविली की पडल्यापडल्या लागलेली शांत झोप म्हणजेच... *"ब्रह्मानंद" !!! "आनंद "

36 likes 90 shares
WhatsApp