Back to feed
K
Kavya Agarwal Family · Mixed · Family

एक छानशी स्टोरी.....मन लावून वाचा खूप छान आहे......... रजनी व राजेश यांचा नुकताच विवाह झालेला. 💓💗💓💗💓💗💓💗 रजनी एकत्र कुटुंबात वाढलेली समंजस गुणी मुलगी होती तर राजेश एकुलता एक मुलगा. थोडासा हम करे सो कायदा म्हणणारा. पण दोघांच खुप छान जमत होतं. दिवस आनंदात चालले होते. त्यांच्या घरी नवीन पाहुणा येण्याची चाहुल लागली दोघांना स्वर्ग दोन बोटे उरला होता. दिवस जात होते रजनीला खुप कडक डोहाळे लागलेले तिला काही पचत नव्हते अन्न जात नव्हते चवथ्या महिन्यात अचानक तिच्या पोटात खुप दुखु लागले. आॅफीसच्या मैत्रिणींनी लगेच जवळच्या ESIS हॉस्पिटलला अ‍ॅडमिट केले रजनी त्यांच्या स्टाफ असल्याने सर्व सोपस्कार लवकर पार पडले. स्पेशालिस्टनी रजनीला तपासले व सांगितले की अॅपेंन्डिस खुप वाढले आहे ताबडतोब आॅपरेशन करावे लागेल नाही तर बाळाला व आईला धोका आहे. राजेश सेकंडशिपला गेलेला त्यामुळे तो रात्री दीड दोन शिवाय येणे शक्य नव्हते. रजनीचा मानलेला भाऊ व तिथलाच कर्मचारी विजय म्हणाला "मी आॅपरेशनच्या पेपर वर सही करतो जे होईल त्याला मी जबाबदार राहीन." या गोष्टीला डॉक्टर तयार नव्हते शेवटी आॅपरेशन पोस्टपाँड केले. आता पर्यंत केलेल्या औषधोपचारानी रजनीला शांत झोप लागली सकाळी फ्रेश झाली डॉक्टर तपासायला आले तेव्हा रजनीच्या पोटात दुखत नव्हते डॉक्टर म्हणाले "आता आॅपरेशनची गरज नाही. " त्या रात्री राजेश हजर असता तर काय झाले असते? ह्या कल्पनेने सुद्धा अंगावर काटा येतो. नसलेल्या आजाराची केवढी मोठी शिक्षा मिळाली असती म्हणतात ना दैव बलवत्तर असेल तर..... एवढ्या मोठ्या हॉस्पिटलच्या स्पेशालिस्ट कडुन अक्षम्य रोग निदान स्टाफ बाबतीत हे घडु शकते बिचार्‍या कामगारांच काय? हॉस्पिटल मधुन घरी आल्यावर ताबडतोब रजनीने बोरीवलीतील फेमस स्री रोगतज्ञाकडे नाव नोंदणी केली. तपासणी करून त्यांनी सांगितले की "पोटात पाणी आहे म्हणून पोट मोठे दिसते औषधानी बरे वाटेल" पुन्हा टेन्शन रजनीची अवस्था बिकट झाली होती. तिला पोटामुळे समोरचं काही दिसायचे नाही मुळातच ती नाजुक व बुटकी होती. तिला गर्भाचा भार सहन होत नव्हता डब्यावर पोळपाट ठेवून कशातरी पोळ्या करायची सर्व स्वयंपाकाची तर्‍हा काही औरच झालेली. तिला बसता येत नव्हते की झोपता येत नव्हते रात्र भर आराम खुर्चीत शांत बसून असायची. सकाळी लवकर उठून कामाला जायचे असायचे रजनीला धावत पळत येताना पाहिले की ट्रेनचा ड्रायव्हर रोज एक मिनिट ट्रेन थांबवायचा कारण त्या वेळी दहीसरला चाळीस मिनिटांनी दुसरी ट्रेन असायची. रजनीला सर्व जण म्हणायचे तुला जुळी मुले आहेत तु डॉक्टरला सांग पुढच्या तपासणी च्या वेळी तिने डॉक्टरांना विचारले "मला जुळी मुले तर नाही ना? आपण सोनोग्राफी करु या का"? त्या बरोबर डॉक्टर एवढे चिडले," तुमचा माझ्या वर विश्वास नाही तर का आलात? " रजनी राजेशला त्यांनी घाबरवून सोडले. दिवस जात होते त्यात अजुन दोन दुःखद गोष्टी घडल्या राजेशची नोकरी गेली व घर मालकाने घर त्वरित खाली करायला सांगितले काय करावे सुचत नव्हते. घरमालकाच्या हातापाया पडलो आणि डिलीव्हरी होईपर्यंत राहु देण्यास घरमालक तयार केले. रजनीची सरकारी नोकरी असल्याने राजेशने नोकरी ऐवजी आधी घर शोधायचा निर्णय घेतला. राजेश सकाळ पासून रात्री पर्यंत घर शोधायला वणवण फिरायचा. कधी रुम चांगली नसायची तर कधी बजेट मध्ये बसायची नाही. रजनीला नववा महिना लागलेला तिची आई तिच्या कडे राहायला आलेली त्यामुळे दोघे निश्चिंत झालेले. एके दिवशी दुपारी रजनीच्या पोटात खुप दुखु लागल्याने बोरीवलीतील भगवती हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट केले डॉ. मीना स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या त्या भगवती रुग्णालयात पोस्ट ग्रॅज्युएट करत होत्या त्यांनी रजनीला तपासता तपासता अनेक प्रश्न विचारले त्यांनी रजनीला सांगितले तुला जुळी मुलं आहेत व ती अशक्त असल्याने मी तुझे आॅपरेशन(सिझेरींग) करणार नाही. लगेच रजनीचा एक्सरे काढण्यात आला डॉ मीनांचे निदान खरे ठरले. स्पेशालिस्टनी दिलेल्या चुकीच्या ट्रीटमेंट मुळे मुलांची वाढ झाली नाही. डॉ मीना पटापट निर्णय घेत होत्या रजनी त्यांना पुर्ण सहकार्य करत होती. खुप प्रयत्नांनंतर रजनीची नॉर्मल डिलीव्हरी होवुन पहिला मुलगा संध्याकाळी साडेसातला जन्माला पावणे आठला दुसरा मुलगा जन्माला रजनी दोन मुलांची आई झाली सर्व जण आनंदात होते. पुढील सर्व सोपस्कार पार पडे पर्यंत साडे आठ वाजले दोन्ही मुले प्रीमॅच्युअर असल्याने त्यांना इनक्युबेटर मध्ये ठेवायचे होते. डॉ मीना त्या दृष्टीने प्रयत्न करत होत्या शेवटी सायन हॉस्पिटलचे RMO मुलांना इनक्युबेटरमध्ये ठेवायला तयार झाले. रजनी, राजेश रजनीची आई . डाॅ मिना व सिस्टर असे सर्व अ‍ॅम्ब्युलन्सने सायन हॉस्पिटलला निघालो अ‍ॅम्ब्युलन्स वार्‍याच्या वेगाने पळत होती. सायन हॉस्पिटलला स्ट्रेचर बाहेर काढून मोकळ्या पटांगणात ठेवले वार्डबाॅयने रुग्णालयात आत आणु दिले नाही एक मुलगा रजनीच्या आईच्या हातात दिला दुसरा रजनीच्या पायात ठेवला डॉ मीना राजेश व सिस्टर RMO ला भेटायला गेले. ज्या RMO शी डॉ मीना यांची बोलणी झालेली त्यांची ड्युटी संपलेली नवीन RMO चं म्हणणे मला चार्ज देताना RMO नी याबाबत काही सांगितले नाही तरी मी एक मुलगा ठेवतो. आई व दुसरा मुलाला कुपर रुग्णालयात ठेवायला काही केले तरी तयार नव्हता RMO आपला हट्ट सोडत नव्हता तो सरकारी हिसका दाखवत होता. पुन्हा डॉ मीनांनी कुपर रुग्णालयाशी संपर्क साधला तिघांना पण दाखल करून घेणार याची खात्री केल्या वर पहाटे तीन वाजता आम्ही कुपर रुग्णालया कडे निघालो सायन रुग्णालयाचा वाईट अनुभव घेतल्या ने मनात धाकधूक होत होती पण इथे खुप छान अनुभव आला. वॉर्डबाॅय दोन्ही मुलांना आत घेऊन गेला योग्य त्या नोंदी करून मुलांना डॉक्टरांनी ताबडतोब तपासले व डॉ मिनांना त्यांनी सांगितले "मुले संध्याकाळी साडेसात पासून पहाटे साडेचार पर्यंत उघड्यावर आहे त्यांना औषध पाणी काही मिळाले नाही त्यामुळे मुलांची तब्येत ढासळली आहे तरीपण मी माझ्या परीने प्रयत्न करतो "मुलांच्या नतंर रजनीच्या तपासण्या करून तिला पण दाखल केले तोपर्यंत पहाटेचे पाच वाजले दुपारी बारा पासून रजनी ला पाणी पण मिळाले नव्हते डॉ मिना यांनी आतापर्यंत घडलेल्या सर्व घटना कुपरच्या डॉक्टरांना सांगितल्या आता तिला चहा पाणी मिळाले. सिस्टरनी स्वतःच्या थर्मास मधला चहा सर्वांना दिला. डॉ मिनांनी मुलांना व रजनीला वाचविण्यासाठी आपले सर्व वैद्यकीय ज्ञान पणाला लावले एवढेच नव्हे तर माणुसकीचे यथार्थ दर्शन घडविले डॉ मीनांनी सुद्धा चहा कॉफी काही ही घेतले नव्हते भरमसाठ फी घेऊन रुग्णाची फसवणूक करणारा डॉक्टर कुठे, नी म्युनिसिपल रुग्णालयात काम करणारी डॉ मीना कुठे? सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर व उध्दट कर्मचारी कुठे, व वैद्यकीय सेवा तत्परतेने देणारे व माणुसकीचे यथार्थ दर्शन घडविणारे कुपर रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टर कुठे. मुलांना वेळीच ट्रीटमेंट न मिळाल्याने मुलांना काविळ झाली व त्यातच मुलांचा अंत झाला तो दिवस होता एक एप्रिल देवाने रजनी व राजेशला एप्रिल फुल केले. रजनी राजेशच्या दुःखाला सीमा राहीली नाही देवाने त्यांना रडायला सुद्धा वेळ दिला नाही नोकरी व घर शोधायला हवे ना? मित्रांनो एका डॉक्टरवर पुर्ण विसंबून राहू नका सेकंड ओपिनियन घ्या सत्यमेव जयते मध्ये अमीर खान हेच सांगितले आहे ह्या सत्यकथा पासून नक्की बोध घ्या आणि second opinion must म्हणा. 

162 likes 45 shares
WhatsApp