एका मुलीचा बापच ही कविता समजू शकतो.. !माझी चिऊ! अंधुक नजरेवरचा चष्मा सांभाळत, अडगळीत सापडली एक बाहुली ; हो हीच ती , हीलाच सतत सोबत ठेवायची माझी चिऊ लाडली । मला हीच बाहुली हवी म्हणुन किती आदळआपट केली तिनं; "पप्पा पप्पा"म्हणत जीवनाला खरा अर्थ दिला तिनं । ती जन्माला आली तेव्हां मी भानावर आलो ; आतापर्यंत उनाड मी कळलें मला मी बाप झालो । रांगत रांगत तिनं अख्ख घर काबीज केलं ; खळंभर घराला घरपण तेव्हां आलं । यायचो कामावरुन थकुनभागुन तेव्हां पळत येवून बिलगायची; रात्री आईजवळुन ऊठुण हळुच कुशीत माझ्या शिरायची । चेपुन द्यायची अंग हात डोक्यावरुन फिरवायची; आंघोळीला बसलो की साबण पाठीला चोळायची । आईनंतर तिच झाली माझी आई हट्ट करुन करुन वाढायची; नको नको चिऊ म्हणताही घास प्रेमानं भरवायची । तब्बेत सांभाळा पप्पा म्हणत औषध वेळेवर द्यायची ; तडपत्या उन्हात वाटायचा आधार तिचा, ती सावली मायेची वाटायची । मूठभर वाळू घ्यावी हातात अन बघता बघता जावी निसटुन; तसेच क्षणही गेले निघुन माझ्या हातुन । चिऊ माझी केव्हा झाली मोठी कळालेच नाही; घरात सर्वांनाच झाली तिची लगीन घाई । चिमणाराजा आला त्यानं गायीली गोडगोड गाणी ; सोडुन माझी बाग चिऊराणी गेली दुरच्या रानी । हुंदके देत रडली किती जातांना, मायही तीची रडली, ओक्साबोक्सी रडली भावंडं काळजाची खिल्पी उडली । मी मात्र उभा स्थितप्रज्ञासारखा कर्तव्य पुर्ण करुन ......... पण माझ्या मनाचाही महामेरु ढासळला ,जेव्हां चिऊ गेली माझ्या समोरुन ........। जाता जाता मात्र म्हणाली , सांगा ना बाबा , आम्हांलाच का ही शिक्षा ; देतो बाप आपल्या मुलीला ताब्यात परक्याच्या, सहज द्यावी जसी भिक्षा । अशी कशी ही रीत बाबा , मुलीला सर्वांपासुन तोडते ; आईबापांची तोडुन नाळ , इतरांशी नाते जोडते । सांगा ना बाबा ,असे गप्प का, सांगा ना एकदा पुन्हा ; कोणी काढली ही रीत , मुलगी असणे हाच का आमचा गुन्हा ।........ .................................. आजही अडगळीतली खेळणी तिची , छातीसी धरुण रडतो ; नाही मिळत ऊत्तर माझ्या चिऊच्या प्रश्नाचं , का बाप कन्यादान करतो ..... का कन्यादान करतो......
109 likes
43 shares