Back to feed
N
Nikhil Bagale Family · Marathi · Family

एका शहरात एक👵 आजी 🍊संत्री विकायला बसायची. . एक दिवस तिच्या जवळ एक 👨तरूण आला साधारण ३० एक वयाचा.. . त्याने 👵आजीला विचारले, *"आजी 🍊संत्री कशी दिली ग?"* . 👵आजीने भाव सांगितला.. . त्याने २ किलो 🍊संत्री विकत घेतली आणि त्यातल एक🍊 संत्र सोलुन एक फोड खाऊन तो तरुण आजीला म्हणाला, *"👵आजी हे संत्र गोड आहे का बघा हो जरा?"* . 👵आजीने ✋हात पुढे करत 🍊संत्र हातात घेऊन एक फोड खाल्ली. आणी म्हणाली. *"लेकरा गोडच हाय की"* . तो हसत हसत आजीच्या हातातील ते संत्र न घेताच निघून गेला. . असच दुसरया दिवशीही तो आपल्या 👩पत्नीला बरोबर घेऊन आला. त्या दिवशी ही त्याने संत्र्याची एक फोड खात 🍊संत्र गोड आहे का विचारत आजीच्या हातात संत्र देऊन हसत हसत घरी गेला. . असे बरेच दिवस निघून गेले. . 👵आजीच्या शेजारची एक भाजीवाली व त्या तरूणाची पत्नी हे रोज पाहत असे. . एक दिवस त्याच्या पत्नीने विचारले, *तु असा रोज वजन झाल्यावर आजीला एक संत्र का देतोस आणि ते ही अर्ध खाऊन?* . तो 👨तरुण आपल्या 👩पत्नीला म्हणाला, *अग वेडे 👵आजी रोज ही🍊 संत्री विकते पण ती स्वतः कधीच ही संत्री खात नाही, कारण तिला २ रूपये कमी मिळतील. मी तिला रोज एक संत्र खायला घालून माझ्या आजीच्या रूपात तिला पाहतो.* . पत्नीने गर्वाने नवरयाला मिठी मारली. दुसरया दिवशीही तसच घडल. . तेव्हा शेजारी असलेली भाजीवाली आजीला म्हणाली, *अग हा पोरगा रोज कशापाई तरास देतो ग तुला आजी? समदी संत्री गोड हायीत.* . आजी तरूणाकडे व त्याच्या पत्नीकडे पाहुन हसत म्हणाली. *अग त्यो पिरमा पायी असा वागतुय. अन त्याचा हा जिव बघुन म्या बी त्याच्या वजनात चार संत्री रोज ज्यादा घालते."* . आजीचे शब्द एकुन त्याला खुप बर वाटल. . मनात विचार करत असताना. शेजारी बसलेली भाजीवाली आजी त्या तरूणाला म्हणाली, *बाळा तु जे गमावत होता ते खुशीत गमावत होतास. म्हणुन तर तुला न मागता संत्री आणि या आजीच प्रेम या दोन्ही गोष्टी मिळाल्या..* . *मित्रांनो ओंजळीत बसेल एवढ नक्की घ्या...* . *पण सांडण्या अगोदरच ते वाटायलाही शिका...* . *माणूसकी कमी होत चाललीय...* . *तेवढी फक्त जपायला शिका...* . *रोज जोक शेअर करता पण आज प्रत्येकाने ही पोष्ट शेअर करा...*

147 likes 17 shares
WhatsApp