P
Prisha Yadav
love · marathi · romantic
एकटेच शब्द माझे सोबतीला सूर नाही दाटले डोळ्यांत अश्रू पण आसवांचा पूर नाही हाच आहे तो किनारा येथेच होती भेट झाली अन् संपली जेथे कहाणी तोही पत्थर दूर नाही तू जिथे अ सशील तेथे पौर्णिमेचा चंद्र नां दो आंधळ्या माझ्या नभा ला चांदण्यांचा नूर नाही ही मेजवानी चालली माझाच केला घात त्यांची पंगतीला या बसावे मी एव्हढा मजबूर नाही रात्र त्यांची झिंगलेली पण आत्मे अस्थिर झाले शांत आहे झोप माझी अंतरी काहूर नाही
254 likes
85 shares