Back to feed
I
Ishaan Rao humor · mixed · humor

एकदा एक मुलगा टाइमपास काहीतरी म्हणून गुगल वर how to get free lunch in 5 star hotel सर्च करत होता.. . गुगल नि रिजल्ट दिला.. . . .😳😳 .... 😝😝😝 . काय पुणेकर का.??? _____________________________________________ पुणेकर एक पोपट पाळतात. पोपट रोज सकाळी-सकाळी मालकाला ऊठवतो. पोपट -ऊठा मालक कामाला जायचय ना? पूणेकरांना पोपटाचा फार अभिमान वाटतो. काही दिवसांनी पूणेकरांची बदली साेलापूरला होते. पोपट -ऊठ कि बे झागिरदार... कामाला कोण तुझा बाप जाणार का कडू? _____________________________________________ आज  एका पोलिस वाल्याने मला थांबवलं कारण  हेलमेट घातल नव्हत.... पोलिसा ने  गाड़ी ची चावी काढून घेतली.. आणि म्हटले, ये माझ्या मागे-मागे" ,. आम्ही तर पुणेकर  मग काय ? . आम्ही खिशातुन  दूसरी चावी काढली , गाड़ी स्टार्ट केली  आणि म्हटलो, आता तू ये आमच्या मागे- _____________________________________________ खडूस पुणेकर आम्ही छत्री का घ्यायची? पुण्यात पाऊस 28 इंच पडतो. तो देखील 4 महिन्यात. महिन्याचा झाला 7 इंच. अर्धा रात्री पडतो, 12 तासात उरला 3.5 इंच. दुपारी 3 तास (1 ते 4) आम्ही झोपतो. उरला 0.88 इंच. एवढ्या टीचभर पावसासाठी .... आम्ही छत्री का घ्यायची? _____________________________________________ punekar mumbaikar jokes मुंबईकर:- काय करता आपण? पुणेकर:- बिझिनेस आहे माझा! मुंबईकर:- कसला बिझिनेस आहे आपला? पुणेकर:-सेलिंग ऑफ सोफिस्टिकेटेड मेन्यूअल गारमेंट होल्डिंग डीवाईसेस!! मुंबईकर:- वा वा ! म्हणजे काय? पुणेकर:- पायजम्याचे नाडे विकतो मी!_____________________________________________ एकदम खतरनाक पुणेकर पुणेरीपणा म्हणजे काय हे शिकण्यासाठी एक माणूस पुण्याला गोखले यांच्याकडे आला. गोखले दारातच उभे होते. त्यांच्यातील संवाद : माणूस:-तुम्ही हा जो पायजमा घातला आहे तो किती दिवस वापरणार ? गोखले:-एक वर्ष ! माणूस:- त्यानंतर फेकून देणार ? गोखले:- नाही ! त्यानंतर आमची सौ त्याच्या हाफ चड्ड्या बनविते. माणूस:- त्या तुम्ही किती दिवस वापरता ? गोखले:-  अन्दाजे एक वर्ष. माणूस:- मग ? गोखले:-  त्यानंतर त्याची आम्ही पिलोकव्हर बनवितो. ती साधारण सहा महीने वापरता येतात. माणूस:-   मग ? गोखले:-   मग त्या फाटलेल्या कव्हरचा उपयोग मी सायकल पुसायला करतो. माणूस:-  मग ते तुकडे टाकून देता ? गोखले:-  नाही ! त्यानंतर सायकलची चेन किंवा अन्य तेलकट भाग पुसायला आम्ही ते तुकडे वापरतो, अन्दाजे सहा महीने पुरतात. माणूस:- त्यानंतर तरी ते मळकट तुकडे तुम्ही टाकून देता की नाही ? गोखले:- नाही ! त्याचा आम्ही काकडा करतो आणि चूल पेटवण्यासाठी वापरतो. माणूस:- म्हणजे त्याची राखाडी होईपर्यंत तुम्ही ह्या पायजम्याची साथ सोडत नाही ? गोखले:- ती राखाडीही आम्ही भांडी घासायला वापरतो. त्या माणसाने गोखल्यांच्या चरणांना स्पर्श केला 😳😆😝😔👆👆😃😃😀😃😛😃😃👏😄 _____________________________________________ काल एक नविन पुणेरी पाटी वाचून बेशुध्द पडता पडता वाचली ...!! "आमच्या येथे 13व्या चा स्वयंपाक करून मिळेल..!" पण..! १५ दिवस आधी ऑर्डर नोंदविणे आवश्यक _____________________________________________ पुणेरी मेडिकल दुकानातील पाटी... आम्हाला  आमच्या कडील सर्व औषधांची एक्स्पायरी डेट माहित आहे,.... पण तुमची माहीत नाही.,,,, तेव्हा कृपया उधार मागू नये. 😝😆😝😝 स्थळ : सदाशिव पेठ एक *वयस्कर* गृहस्थ विचारत होते ... इथे आधार कार्ड कुठे काढून मिळतं...??? तर मिळालेलं उत्तर: कशाला थोडक्यासाठी काढताय आता ???????? 😂😂😂😂😂😂😂 अमेरिकन : आमच्या देशात सगळे लोक उजवीकडून गाड्या चालवतात.🚕 तुमच्या कडे काय पद्धत आहे? 😛😛😆 😝😝😃😀😆 👱पुणेकर : तसं काय फिक्स नसतं, म्हणजे समोरचा कुठून तडफडतो त्याच्यावर आहे..🚗 😜😝😂

40 likes 3 shares
WhatsApp