A
Anaya Bose
spiritual · marathi · spiritual
एकदा यमलोकात यमदेव निवांत बसले होते. तेवढ्यात दरवाजावर टकटक असा आवाज झाला. यमदेवांनी दार उघडलं तर एक मनुष्य समोर उभा होता. पण क्षणात तो गायब झाला. यमदेवांनी दार लावलं आणि पुन्हा निद्रिस्त झाले. थोड्यावेळाने पुन्हा दार वाजले पुन्हा त्यांनी दार उघडलं आणि पुन्हा तो मनुष्य समोर उभा. पण पुन्हा तो क्षणात गायब झाला. असं ३-४ वेळा घडलं. मग यमदेव वैतागले आणि तो दिसताच त्यावर जोरात ओरडले, “काय रे, लय चरबी आली का तुला ?माझ्याशी पंगा घेतोस?” मनुष्य : नाही देवा. मी तर पृथ्वीवर वेंटिलेटरवर आहे. ते डॉक्टर तुमची चेष्टा करतायत. 😀😀😂😀😀😂😀😀
149 likes
47 shares