Back to feed
A
Arjun Kapoor Family · Marathi · Family

‬: एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात.. पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो.. माझ्या आईने मला नसेल शिकवले पोळी करायला पण तिने मार्ग दाखवला "आपली पोळी कमवायला" माझ्या आईने मला नसेल शिकवले साडी नेसायला पण तिने शिकवले आहे "पदर सांभाळायला" माझ्या आईने मला नसेल शिकवले दारात रांगोळी रेखायला पण तिने शिकवले आहे दारी आलेल्याचा मान राखायला माझ्या आईने मला नसेल शिकवले भरतकाम करायला पण तिने शिकवले आहे नात्यांची नाजूक वीण घट्ट ठेवायला माझ्या आईने मला नसेल वाढवले "एक मुलगी" म्हणून पण तिने मला घडवले आहे एक "व्यक्ती" म्हणून

207 likes 82 shares
WhatsApp