Back to feed
A
Anaya Agarwal Spiritual · Mixed · Spiritual

एकदा *सून* आणि मुलगा बेडरूम मध्ये बोलत असताना *आईच* लक्ष जातं, मुलगा - "आपल्या job मुळे *आईकडे* लक्ष देता नाही येणार गं, तिचं आजारपण आणि देखभाल कोण करेल......?" त्यामुळे आपण वृद्धाश्रमात ठेवलं तर तिच्याकडे लक्ष सुद्धा देतील ते " त्या वर त्याच्या बायकोचे उत्तर ऎकून *आईच्या* डोळ्यात पाणी आले. . . . . . . .. *सून* - "पैसे कमवण्यासाठी पूर्ण जन्म बाकी आहे ऒ , पण *आईंची* माया किती कमवली तरी कमी आहे, त्यांना पैश्यापेक्षा आपल्या सहवासाची गरज आहे , मी जर job नाही केला तरी जास्त नुकसान होणार नाही. मी *आईंजवळ* थांबेन. घरी tution घेईन , त्यामुळे *आईं* जवळही राहता येईल. विचार करा लहानपणी बाबा नसूनही घरकाम करून तुम्हाला *आईने* वाढवलंय. त्यांनी तेंह्वा कधी शेजारच्या बाईकडे सुद्धा तुम्हाला ठेवल नाही, कारण तुमच्या कडे व्यवस्थित लक्ष देणार नाहीत म्हणून, आणि तूम्ही आज हे असं बोलताय...? तूम्ही कितीही म्हणा पण *आई* आपल्या जवळच राहतील. अगदी शेवटपर्यंत " *सुनेने* दिलेल्या उत्तरामुळे *आई* खूप रडते आणि बाहेरच्या खोलीत येउन देवा जवळ उभी राहते . . . *आई* देवाऱ्यापुढे उभी राहून त्याचे आभार मानते , आणि म्हणते " देवा मला मुलगी नव्हती म्हणून खूप भांडली रे मी तुझ्याशी, पण हि *भाग्यलक्ष्मि* दिल्याबद्दल तुझे आभार कसे मानू मी.....?" खरच देवा सार्थक केलस माझ आयुष्य अशी *सुन* देऊन . आवडल तर शेअर करायला विसरु नका. . *!! आई !!*👌👌👌

53 likes 31 shares
WhatsApp