Back to feed
A
Aditya Patel life · marathi · life

ऐक ना माझ्या मनातले गुज थांब सखे तू थांब ना जरा गं भरलीया आठवांची ओंजळ थांब सखे तू थांब ना जरा गं या इथेच तो राजस दिसला हळूच पाहुनी मोहक हसला नकळत कधी निघोनी गेला अस्तित्वाचा तरी दरवळ उरला गं - 1 दरवळ नकळे कधी अंगी भिनला कल मनाचा कधी तिथेच झुकला हर प्रयत्नही तेथे माझा तेथे हुकला मनताबा तिकडेच जाऊन बसला गं -2 जरी कुठे दूरवर साजण असला तरी प्रत्येक खूण आठवे मजला होतसे त्याचे स्मरण एकेक क्षणाला त्यानेच जगते मी प्रत्येक पावला गं -3

134 likes 52 shares
WhatsApp