ऑपरेशन उरण : नेव्हीने थांबविले उरण येथे सुरु असलेले बंदूकधारी ४ संशयिताना शोध मोहीम पोलिसांनी आणि नेव्हीने थांबविले आहे असे जाहीर केले आहे. मात्र यात सध्या छुप्या पद्धतीने संशयितांना शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून तपास यापुढेही सुरूच राहणार आहे.उरण शहरात 4-5 संशयित तरूण दिसल्याची माहिती समोर आली आहे. नौदलाकडून या भागात दोन दिवस सर्च ऑपरेशन राबविण्यात आलं होतं. दोन विद्यार्थ्यांनी बंदुकधारी पाहिल्याची माहिती दिली होती. त्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणाना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. तर मुबई मध्ये हाय अलर्ट अजूनही असून पोलिस शोध कायम ठेवणार आहे. उरण हा अतिसंवेदनशील भाग असल्याने मुलांच्या माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले होते. परंतु दोन दिवसांनंतरही तपास पथकाच्या हाती काहीच न लागल्यामुळे हे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं आहे.
106 likes
79 shares