Back to feed
S
Sahil Chauhan Love · Marathi · Heartbreak

ओळीवरुन कविता माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही..! दु:ख हे आभासी ================== "माझ्या मनाप्रमाणे" काहीच होत नाही..! दुःखात या आभासी मी आता रमत नाही. ठाऊक मला आताशा.. घडते इतकेच कधी की; इच्छा अन पुर्ततेची वेळा जूळत नाही..!! मनी येईल जे कधी का त्या झपटून ल्यावे.. ही रित पुर्ततेची त्या मुळीच रुचत नाही. माझे म्हणोनि जे का असे ते पावो मजसी, इतकीच अपेक्षा असे तरी.. तृप्तीचा अमृत सोहळा येथे घडत नाही. वेडे भुलते, हरवते मायेच्या अद्भुत बाजारी.. करी कामना उंच झुल्याची.. तरी धावे, खेळे घसरगुंडी..! एकची एक मनीषा अखंड उरी बाणावी; हे ऐसे काही करणे त्याला साधत नाही. स्वभाव दोष असा की हुकले कितीक काही.. तरी स्व अभिमानी कण्याचा ताठा सरत नाही. इच्छा, इच्छा म्हणोनी, न अगतिक, ना लाचार होई.. जणू त्यासच त्याची आकांशा कळत नाही. त्या संगे हितगुज करते, समजूनी घ्यावे म्हणोनी.. क्षणी एका वाटे गेले संभ्रम सारे सरोनी.. मग कुस बदलता जराशी, वाटे की भ्रम असावा तोची..! प्रमाण म्होणोनी सांगावे, ऐसे काही न यावे हाती. ती मनीषा त्या क्षणाची.. ही निराशा केवळ एका याच क्षणाची.. इतके समजून घेता; दुःख सरे आभासी. प्रमाण चंचलतेचे मी कुठेच लावत नाही. ती फसवी निराशा या मनास ग्रासत नाही. "माझ्या मनाप्रमाणे" काहीच होत नाही..! दुःखात या आभासी मन आता रमत नाही.

0 likes 0 shares
WhatsApp