Back to feed
M
Manav Singh Love · Marathi · Heartbreak

का अजूनही तू हवीशी वाटतेस " एवढं " सारं झाल्या नंतरही ..... तुझे हात पहिले की , कधी काळी झालेल्या स्पर्शांची आठवण होते तुझ्या अशा किती तरी गोष्टींशी निगडीत अगणित गोष्टी आठवत राहतात तुझं नि माझं झालेलं शेवटचं भांडण शेवटचे माझ्याशी बोललेले शब्द ,शेवटचातो राग आणि मग पुढे,मी लपवलेले सुक्या पापण्यान्मागचे ओले अश्रू अन हसऱ्या खळी मागाची कडवट दुःख .... वाटायचं की तुझे ही डोळे भरून आले असतील कदाचित तुही गुडघ्यांत मान खालीघालून रात्रभर बसली असशील झोपेची वाट बघत, मी बोलल्याचे भास होऊन सुखावली असशील.. तुही. ..कदाचित.... कोणास ठाऊक कदाचित सुटकाही मिळाली असेल तुला माझ्यापासून .. .माझ्या स्वभावापासून .... आता बरेच महिने लोटले आता बऱ्यापैकी पुसलंगेलय दुःख शेवटी काळ हे जालीमऔषध असतं " असल्या " जखमांवर ... किंवा नसेलही कदाचित ..... का अजूनही तू हवीशी वाटते " एवढं " सारं झाल्यानंतर ही...💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp