Back to feed
R
Reyansh Bhat Family · Mixed · Family

*कुणीच कुणाच्या जवळ नाही* *हीच खरी समस्या आहे* *म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी* *आणि आमावस्या जास्त आहे* *हल्ली माणसं पहिल्या सारखं* *दुःख कुणाला सांगत नाहीत* *मनाचा कोंडमारा होतोय* *म्हणून आनंदी दिसत नाहीत* *एवढंच काय* *एका छता खाली राहणारी तरी* *माणसं जवळ राहिलीत का ?* *हसत खेळत गप्पा मारणारी* *कुटुंब तुम्ही पाहिलीत का ?* *अपवाद म्हणून असतील काही* *पण प्रमाण खूप कमी झालंय* *पैश्याच्या मागे धावता धावता* *दुःख खूप वाट्याला आलंय* *नातेवाईक ,शेजारी ,कुटुंबातले* *फक्त एकमेकाला बघतात* *एखाद दुसरा शब्द बोलतात* *पण काळजातलं दुःख दाबतात* *जाणे येणे न ठेवणे , न भेटणे , न बोलणे* *या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका* *गाठी उकलायचा प्रयत्न करा* *जास्त गच्च होऊ देऊ नका* *धावपळ करून काय मिळवतो* *याचा जरा विचार करा* *बँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा* *आपल्या माणसांची मनं भरा* *एकमेका जवळ बसावं बोलावं* *आणि नेहमी नेहमी* *तिरपं चालण्याच्या ऐवजी* *थोडं सरळ रेषेत चालावं* *समुद्री चोहीकडे पाणी* *आणि पिण्याला थेंबही नाही * *अशी अवस्था झालीय माणसाची* *यातून लवकर बाहेर पडा* *चर्चा करून उपाय शोधा* *Only Convent , CBSE*, *MBA , IIT , MS ,पॅकेज*, *Business skill* *Second Home , Europe Tour* *याला काहीही अर्थ ऊरणार नाही* , *माणसं अन माणुसकी नसलेली घरे* *अन देव नसलेले देव्हारे* *कितीही पॉश असले* *तरी त्याचा काय उपयोग* .. राम कृष्ण हरि

66 likes 84 shares
WhatsApp