M
Meera Mishra
love · marathi · romantic
कधी नव्हतं ते,पडलं तुझ्या प्रेमात शांत मनाचं हरीण,शिरलं गुलाबी वनात माया तुझ्याविषयी, वाढली माझ्या मनात थकलं होतं हरीण,फिरून उन्हातान्हात… बोलावसं वाटायचं,एकदम मणभर विचारांचं बोचकं,सोडून भराभर पाहता क्षणी तुझी, नजर माझ्यावर बोचकं तर सोड,गाठ सुटेना लवकर सगळ्यामध्ये असताना,तुझं चोरून बघणं दुपारची झोप टाळून, तुझं वाट पाहणं मी नसताना आई ला,विचारपूस करणं माझ्या वेड्या प्रश्नांना,खळी देऊन हसणं वनातलं हरीण आता,विसावलं तुझ्या प्रेमात तुझ्या गालावरची खाली आता,रुजली माझ्या मनात तुझ्या साथीचा पाऊस आता,पडू दे या वसंतात मनाचं हरीण माझ्या आता,हरवू दे गुलाबी वनात….
98 likes
1 shares