करुण कहाणी.... ऐका एका अबलेच्या आयुष्याची करुण कहाणी, हतबल होता अखेर तिला पर्याय उरला नाही.... परिस्थितीच्या विळख्याने कसे तिला वेढले? लग्न होऊनी सासर तिजला खेड्यातले मिळाले, अशिक्षित आणि अंधश्रद्दाळू कुटुंबाने तिज ग्रासले, होता पहिली मुलगी तिजला सासरच्यांनी छळीले... संस्कारांची जाण ठेऊनी तिने सासर-माहेर जपले, कसेबसे या धुसरलेल्या संसारात रंग भरले. पुन्हा एकदा बाळाच्या चाहुलीने सारे सुखावले, वंशाला दिवा येईल या आशेवर विसंबले.. हिरमूड झाला तयांचा आनंदावर विरझन पडले, पुन्हा एकदा मातेच्या पोटी कन्यारत्न जन्मले... दोन मुलींच्या जन्माने तिचा सासुरवास वाढला, सारे असुनी निमूटपणे तिने वनवास भोगला... सासरच्यांचा रागाचा पारा शिगेला पोहचला, वंशाला दिवा हवाच म्हणून तगादा लावला.. वैद्यांचा सल्ला डावलून तिला संकटात लोटले पुन्हा तिसऱ्यांदा दोन जीवांना धोक्यात घातले..!! होईल तिसरा मुलगा म्हणून तिला भरीस घातले, नाईलाजास्तव भाबडिने त्या, पाऊल पुढे टाकले.. पण येता नियतीचा घाला सारा संसार विखुरला, या बुरसटलेल्या विचाराने दोन जीवांचा अंत झाला.. दोन चिमुकले जीव पोरके आईविना भिकारी, ऐसी त्या अबलेच्या आयुष्याची करुण कहाणी
247 likes
39 shares