Back to feed
S
Saanvi Verma Family · Marathi · Family

काल परवा एक बातमी सतत दाखवत होते मराठी news ला ! पाळणाघरात १० महिन्याच्या मुलीला झालेली अमानुष मारहाण ! सगळ्यांनी त्या पाळणा घर चालीकेला दोषी धरले (आणि ते धरावे सुद्धा !) आणि ज्या मुलीला मारहाण झाली तिची आई tv वर रडू रडू झालेल्या घटनेचे वर्णन करून सहानुभूती मिळवत होती पण एकानेही तिला प्रश्न केला नाही कि ""एवढ्या लहान मुलीला पाळणा घरात का ठेवले ? स्वतः चे मुल महत्वाचे कि जॉब ? पैश्याच्या मागे इतके लागलो कि स्वतः च्या पोटाच्या लेकराला अनोळखी लोकांच्या ताब्यात देवू लागलो ? या सगळ्या घटनेत सगळ्यात जास्त दोषी ती आई आहे जी १० महिन्याच्या मुलीला पाळणाघरात ठेवत होती ! सासू -सासरे नको ! एकत्र कुटुंब नको ! आई पणाची जबाबदारी नको ! पोटाच्या लेकरा पेक्षा करिअर महत्वाचे ! . मग जर लेकरू मोठे झाल्यावर आई बापाला वृद्द्श्रमात ठेवत असेल तर त्यात त्याची चूक काय ? जेव्हा त्याला गरज असते तुमची तेव्हा काही आई बाप त्याला पाळणा घरात ठेवता आता जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असते तेव्हा त्याने वृद्धाश्रमात ठेवले तर काय चुकले ?

5 likes 25 shares
WhatsApp