Back to feed
K
Kiara Gupta love · marathi · romantic

कविता भूमिपुत्रांच्या --------------------------------- साहेब, आमच्या शेतीमातीच्या गणितात चूक आहे, का तुमच्या हिशेबात काही तरी मेख आहे..? आम्ही तुमचे, तुम्ही आमचे नुसती शब्दफेक आहे, शेतकऱ्यांशी वागणं तुमचं कुठं साहेब नेक आहे? साहेब, नाही पिकवत आजपासून आम्ही शेतात बाजरी-गहू, कारखान्यातल्या नटबोल्टांनी पोट कसं भरतं पाहू..? साहेब, तुमच्या पोकळ गप्पांनी गणित कसं सुटेल, शेतात नाही पिकलं तर भूक कशी मिटेल..? म्हणून म्हणतो साहेब आपण असं करून पाहू, आमच्या हाती लेखणी तुमच्या हाती नांगर एकदा तरी देऊन पाहू..! साहेब, उन्हात शेत नांगरताना घाम तुमचा गळू लागेल, चुकलेलं गणित आमचं आपोआप सुटू लागेल..!

255 likes 23 shares
WhatsApp