Back to feed
A
Atharv Chauhan family · marathi · family

कवितातल्या प्रत्येक शब्दांत आता मी मलाचं उतरवतो तु वाचशील कधीतरी म्हणून मी कवितांत मलाचं रमवतो कवितातल्या प्रत्येक शब्दांत मी माझं आता प्रेम मांडतो पाहशील कधीतरी तु कविता माझी म्हणून मी कवितांत जावून लपतो कवितातल्या प्रत्येक शब्दांत मी आता माझ्या भावना लिहीतो कधीतरी घेशील तु समजून मला म्हणून मी आता कविता लिहीतो... आवडन का नाही तुला कधी कविता माझी माहीत नाही गं मला पण खरचं मनापासून आणी अगदी मनातलं लिहीतो...

58 likes 40 shares
WhatsApp