A
Aadhya Chauhan
Love · Marathi · Heartbreak
कवळून उराशी घेत देह निश्चेत बैसली होती ती वीरमाय गंभीर धरोनी धीर पुत्र देहांती समरात जाहला घात एक आघात सांडला सूत मातेचा सोडून हात दूर लोकात निघाला पूत आवेग दाटला असा लोपल्या दिशा किर्र काळोखी आक्रोश करावा कसा कोरडा घसा माऊली दुःखी स्वप्नांचे विटले रंग जाहले भंग चित्र देखणे आधार खंडिला हाय अभागी माय भोग भोगणे अभिमान दाटतो उरी एकली जरी माय राहिली पुत्राचे अर्पून श्वास भंगली कूस धन्य जाहली
0 likes
0 shares